Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रDeepak Kesarkar : जरांगेंनी समाजाच्या सहानुभूतीचा विचार करावा; दीपक केसरकरांचा सल्ला

Deepak Kesarkar : जरांगेंनी समाजाच्या सहानुभूतीचा विचार करावा; दीपक केसरकरांचा सल्ला

Subscribe

माध्यमांशी बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. काही तांत्रिक प्रक्रिया असतात. त्या पूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे त्यांची सगेसोयरे यांच्यासंदर्भातील मागणी होती, त्या नोटिफिकेशनवर सरकार सकारात्मक आहे.

मुंबई : राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देऊनही मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागणीवर ठाम असून, त्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. याचदरम्यान मंत्री दीपक केसरकरांनी जरांगेंच्या आंदोलनावर भाष्य केलं आहे. जरांगेंनी मराठा समाजाच्या सहानभूतीचा विचार करावा असा सल्ला त्यांनी दिला. (Deepak Kesarkar Jarange should consider the sympathy of the society Advice from Deepak Kesarkar)

माध्यमांशी बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. काही तांत्रिक प्रक्रिया असतात. त्या पूर्ण कराव्याच लागतात. त्यामुळे त्यांची सगेसोयरे यांच्यासंदर्भातील मागणी होती, त्या नोटिफिकेशनवर सरकार सकारात्मक आहे. ही गोष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात सांगितली आहे. अशामुळे लोकांची एक सहानुभूती जी मराठा समाजाला मिळत आहे, ती कमी होत आहे, याचा त्यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आनंदाने पुढील कारवाई करण्यासाठी वेळ लागेल, त्यासाठी त्यांनी तो वेळ दिला पाहिजे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Mhada Lottery : पारदर्शक सोडतीमुळे म्हाडावर सर्वसामान्यांचा विश्वास- मुख्यमंत्री शिंदे

बारसकरांचे जरांगेंवर गंभीर आरोप

मनोज जरांगे यांचे जुने सहकारी अजय महाराज बारसकर यांनी आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन मनोज जरांगे यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी बोलताना बारस्कर म्हणाले की, जरांगेंनी माझ्यावर बलात्काराचा आणि विनयभंगाचा आरोप केला. तर मग त्या पीडित महिला त्यांनी समोर आणाव्यात. त्याचबरोबर मी प्रश्न आरक्षणाबाबत विचारले पण जरागेंनी त्याची उत्तर दिली नाहीत. 17 दिवसांपासून आंदोलन सुरु होतं तेव्हा जरांगे कोणाच्या घरात बसून दूध भाकरी खात होते? कोणाकडून पाय चेपून घेतले याचे माझ्याकडे रेकॉर्ड आहे असाही गौप्यस्फोट अजय महाराज बारसकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : Budget session : सोमवारपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; कायदा- सुव्यवस्थेचा मुद्दा गाजणार?

जरांगेविरोधात ईडीकडे जाणार

याचबरोबर कोणत्या महिलेला अंबडचा आमदार बनवण्याचं आश्वासन दिलं, हे मला माहिती आहे. पण आमची संस्कृती ती नाही. रातोरात जरांगेंकडे मोठा पैसा आला याविरोधात मी इन्कम टॅक्स आणि ईडीकडं जाणार आहे, असंही बारस्कर यावेळी म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -