घरमहाराष्ट्रDeepak Kesarkar : केसरकरांविरोधात सिंधुदुर्गात मालवणी भाषेतील बॅनर; सोशल मीडियावर चर्चा

Deepak Kesarkar : केसरकरांविरोधात सिंधुदुर्गात मालवणी भाषेतील बॅनर; सोशल मीडियावर चर्चा

Subscribe

रत्नागिरी : शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याविरोधात वेंगुर्ले तालुक्यता बॅनर लावण्यात आले आहे. यात बॅनरमध्ये दीपक केसरकरांना निवृत्तीचा सल्ला देण्यात आला आहे. या बॅनरची माहिती पोलिसांनी तातडीने ते बॅनर काढून टाकले. पण दीपक केसरकर यांच्याविरोधात लागलेल्या बॅनर चर्चा सर्वत्र सुरू झाल्या आहेत.

काही दिवसापूर्वीच दीपक केसरकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीत लढण्यासाठी इच्छुक असलेले टिल्लू-पिल्लू घाबरण्याची प्रतिक्रिया केसरकरांनी दिली आहे. या वेंगुर्ले तालुक्यातील म्हणले, भोगवे परिसरात अज्ञातांकडून लावण्यात आलेल्या या बॅनरवर केसकरांना उद्देशून मालवणी भाषेतून बॅनर लावले आहे. या बॅनरमध्ये म्हटले, “भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासून हात जोडून सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता…’ ,अशी मिश्किल टीका बॅनरमधून केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Sanjay Raut : जे. पी. नड्डा यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन, राऊत म्हणतात – “ढोंग बंद करा”

महायुतीतील काही नेत्यांनी हे बॅनर लावण्याचे त्यांनी नाव न घेता सांगितले. पण त्यांचे प्रयत्न यशस्वी होणार नाही, असा दावाही दीपक केसरकरांनी केला आहे. दीपक केसरकरांनी नाव न घेता भाजपाचे विधानसभा निवडणूक क्षेत्र प्रमुख आणि माजी आमदार राजन तेली यांच्याकडे इशारा केल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत केसरकरांनी तेलींचा 15 हजार मतांनी पराभव केला होता. केसरकर आणि तेलींचेय जुने राजकीय वैर आहे. यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघता भाजपावर तेली दावा असल्यामुळे विधानसभेत भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांना लढवण्यासाठी इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

- Advertisement -

 

 बॅनरमध्ये नेमके काय लिहिले?

प्रिय दीपकभाई,

म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ?? कशी आठावतीत?? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्च्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगून आमची मता मात्र घेतलास.

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासून हात जोडून सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असे बॅनरमध्ये मालवणी भाषेत मजकूर  यावर लिहिण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -