Homeमहाराष्ट्रDeepak Kesarkar : मनोज जरांगेंनी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे - केसरकर

Deepak Kesarkar : मनोज जरांगेंनी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे – केसरकर

Subscribe

मुंबई : मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील यांनी कायदेशीर प्रक्रिया समजून घेतली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सगेसोयऱ्यांच्या हरकतींवर दिली आहे. पैसे न दिल्यामुळे मंत्रीपद दिले नाही, असा आरोपही दीपक केसरकर यांनी दिला आहे.

मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर दीपक केसरकर म्हणाले, “मनोज जरांगे यांच्या बद्दल मला आदर आहे, पण कोणी काय बोलावे याला सुद्धा मर्यादा आहेत. मराठवाड्यात कुणबी दाखले द्यायला सुरुवात केली. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे. आलेल्या हरकतींना उत्तर द्यावे लागते आणि नोटीफिकेशन कायम करायला लागते. ही प्रक्रिया पूर्ण नाही केली तर, आमचे नोटीफिकेशन रद्द होईल. हे मनोज जरांगे पाटील यांनी कायदे तज्ञाकडून समजून घ्यावे, ऐवढी आमची त्यांना नम्र विनंती आहे.”

हेही वाचा – Sanjay Raut : जे. पी. नड्डा यांचे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन, राऊत म्हणतात – “ढोंग बंद करा”

पैसे न दिल्यमुळे मंत्रिपद गेले

ठाकरे गटाकडून कोणी पैसे मागितले होते आणि त्यांचे काय म्हणणे होते? या प्रश्नावर दीपक केसरकर म्हणाले, “मी जे बोललो त्याला आव्हान दिले आहे. माझ्याकडून मंत्रीपदासाठी पैसे मागितले होते, हे सत्य आहे. मी पैसे देऊ शकलो नाही. त्यामुळे मला मंत्रीपद दिले नाही. पण मंत्र्यांचे परीक्षण करण्यात आले. त्यात मी पहिल्या क्रमांकाचा राज्यमंत्री होतो. जेव्हा पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे एकत्र आले होते, तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते, उद्या येणाऱ्या सरकारमध्ये तुम्ही मंत्री असाल. त्यावेळी मी स्वतः सांगितले होते, मी कोकणी म्हणून शाळेत स्वाभिमानी आहे. तुमच्या हाताखाली मंत्री होणार नाही. खोके बोलणारे स्वतः खोके मागत असतात उद्धव ठाकरे माणुसकी विसरतात म्हणून लोक त्यांच्यापासून लांब जातात”, असे गंभीर आरोप दीपक केसरकरांनी केले आहेत.