मंत्रिमंडळात समावेश नसल्याने बच्चू कडू नाराज?, दीपक केसरकर म्हणाले…

bacchu kadu

मंत्रिमंडळ विस्तारानंतर बच्चू कडू यांची नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिमंडळाच्या पहिल्या टप्प्यात बच्चू कडू यांचे नाव नव्हते. दरम्यान मंत्रिमंडळात आपली वर्णी लागणार असा विश्वास व्यक्त करत आपल्याला ग्रामीण भागाशी संबंधित खात्यामध्ये काम करण्यास आवडेल, असे बंच्चू कडू यांनी सांगितले होते. पण मंत्रिमंडळात समावेश झाला नसल्याने ते नाराज असतील तर त्यांना आम्ही सर्व मंत्री भेटणार असल्याचेही केसरकरांनी सांगितले.

सर्वजण भेटून मनधरणी करणार –

शिंदे गटात मंत्रिपदावरुन कोणाचीही नाराजी नसल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर हे पटवून देत आहेत. तर उर्वरित आमदारांना दुसऱ्या टप्प्यात संधी मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. हे सर्व सांगत असताना कुणाला मंत्रीपद द्यायचे आणि नाही हे ठरविण्याचा अधिकार केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना असल्याचेही ते म्हणाले. पण जर बच्चू कडू नाराज असतील तर त्यांना आम्ही सर्व मंत्री भेटणार असल्याचेही केसरकरांनी सांगितले.

खाते वाटपाचा अधिकार मुख्यमंत्र्यांना –

मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिंदे गटातील कोणीही नाराज नाही. शिवाय तसे काही कारणही नाही. सर्वांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याचा शब्द प्रमाण असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे. इतरांना पुढच्या टप्प्यात संधी मिळेल असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला तर खाते वाटपाचा अधिकार हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच असल्याचे सांगितले.