घरताज्या घडामोडीबच्चू कडूंचा दुसऱ्या टप्प्यात होणार विचार, दीपक केसरकरांनी दिली माहिती

बच्चू कडूंचा दुसऱ्या टप्प्यात होणार विचार, दीपक केसरकरांनी दिली माहिती

Subscribe

राज्यातील शिंदे सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार अखेर पार पडला आहे. यामध्ये शिंदे गटाच्या ९ आणि भाजपच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. परंतु अपक्ष आमदारांना संधी न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कॅबिनेटमंत्री दीपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रतिक्रिया दिली आहे.

आमच्याकडे दोन अपक्ष मंत्री होते आणि दोघांपैकी एकालाच घेतलं असतं तर वेगळा संदेश जाऊ शकला असता. बच्चू कडू हे खरंतर ज्येष्ठ आहेत, ते एका पक्षाचे अध्यक्ष देखील आहेत. आमचे अत्यंत प्रिय असे आमदार आहेत. त्यांचा योग्य तो मान दुसऱ्या टप्प्यात ठेवला जाणार आहे, तसं आम्हाला मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

माझे त्यांच्याशी अतिशय चांगले संबंध आहेत, मी देखील त्यांची भेट घेणार आहे. रागवण्यासारखं काहीही कारण नाही, कारण मी मंत्रिमंडळात असेन की नाही, याची मला स्वत:लाच खात्री नव्हती, असं दीपक केसरकर म्हणाले.

पहिल्या टप्प्यमध्ये आमच्या वाट्याला फक्त ९ मंत्रीपदं आली होती. त्यामुळे काही जणांना पहिल्या टप्पात संधी मिळाली नाही. परंतु मी आणि भरत गोगावले यांच्यामध्ये विचार सुरू असता, गोगावलेंनी माघार घेतली. तसेच मला पुढच्या वेळी संधी द्या, तुम्ही आता शपथ घ्या, असं भरत गोगावलेंनी केसरकरांना म्हटलं होतं. त्यामुळे पुढच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात इतरांचा विचार करण्यात येईल, कुणीही नाराज होऊ नये, असं केसरकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : मंत्रीपदासाठी वरिष्ठ नेतृत्वाची भेट घ्यावी, एकनाथ खडसेंचा पंकजा मुंडेंना सल्ला


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -