मला पंतप्रधान करा, 370 कलम रद्द करतो; केसरकरांनी सांगितला मोदींचा जुना किस्सा

पाचगणी येथे राज्यस्तरीय काव्य संमेलनाचा सांगता समारंभ पार पाडला. यावेळी शालेय मंत्री दिपक केसरकर यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत मोदींचा जुना किस्सा सांगितला. बाळासाहेबांची इच्छा मोदींनी पूर्ण केल्याचंही दिपक केसरकर यांनी सांगितलं.

माझी खात्री आहे, भविष्यात सर्वच्या सर्व शिवसैनिक बाळासाहेबांच्या विचारासोबत राहतील. बाळासाहेबांनी मला एकदा पंतप्रधान करा, मी 370 कलम एका दिवसात रद्द करतो. असं म्हणणाऱ्या बाळासाहेबांनंतर मोदींनी तो निर्णय घेत कलम रद्द केलं. त्याच काश्मीरमध्ये जाऊन कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांना कोण मिठी मारत असेल, तर त्याच्यासारखा बाळासाहेबांचा अपमान असूच शकत नाही, असं दिपक केसरकर म्हणाले.

सावरकरांबद्दल अनुद्गार सहन करणार नाही. दहशतवाद्यांनी रोखल्यानंतर एकही विमान हज यात्रेला जाऊ देणार नाही, असा इशारा बाळासाहेबांनी देताच वैष्णोदेवीची यात्रा सुरू झाली, ते पूर्ण देशाला माहित आहे. असं असताना यात्रा काढणारे महाराष्ट्रात येऊन सावरकरांबद्दल अनुद्गार काढतात. महाराष्ट्राची जनता कधीही सहन करणार नाही, असं केसरकर म्हणाले.

मोदींना नेता म्हणून जगात मान्यता मिळाली आहे. G20 चे अध्यक्षपद त्यांच्याकडं आहे. ज्याच्यासाठी लोकांनी आम्हाला निवडून दिले. त्या विचारांच्या विरोधात जात असाल तर महाराष्ट्राची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही. गद्दार, लाचार कोण, ते जनतेला कळेल, असं म्हणत केसरकरांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

धनुष्यबाण नेहमी बाळासाहेबांचा राहिला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा ज्यांनी त्याग केला त्यांना धनुष्यबाण मागण्याचाही अधिकार नाही. जे काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत गेले. त्यांना ना बाळासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार आहे. तसेच ना धनुष्यबाण वापरण्याचा अधिकार आहे, अशा शब्दांत केसरकरांनी ठाकरे गटाला टोला लगावला.


हेही वाचा : ठाकरे-आंबेडकर युती : कसा असे फॉर्म्युला? उद्धव ठाकरे म्हणाले…