घरताज्या घडामोडी...लवकरच बच्चू कडू मंत्रीमंडळात दिसतील?, दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

…लवकरच बच्चू कडू मंत्रीमंडळात दिसतील?, दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये वाद सुरू असून हा वाद आता चव्हाट्यावर आला आहे. अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन पैसे घेतल्याचं रवी राणांनी म्हटलं आहे. त्यामुळे राणांच्या या आरोपावरून बच्चू कडू संतप्त झाले आहेत. त्यांनी १२ आमदारांना घेऊन सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी बच्चू कडूंना मंत्रीमंडळात स्थान मिळण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

दीपक केसरकरांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, बच्चू कडू हे जेष्ठ नेते आहेत. त्यांच्यासोबत दोन आमदार आहेत. अन्य आमदारांच्यावतीने ते बोलत असतील तर, मला त्यातील वस्तुस्थिती माहिती नाही. लवकरच ते मंत्रीपदी दिसतील, अशी आमची अपेक्षा आहे, असं दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेच्या ४० आमदारांनी आणि १० अपक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. परंतु मंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार हा दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यातील काही मंत्र्यांचा विस्तार झाला. परंतु यामध्ये बच्चू कडूंची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता होती. मात्र, त्यांना पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळालं नाही. तर दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये. त्यामुळे बच्चू कडू नाराज असल्याचं सांगितलं जात आहे.


हेही वाचा : ठाकरेंचं शिंदे-फडणवीस सरकारपेक्षा एक पाऊल पुढे, दानवे आणि आदित्य ठाकरे उद्या नाशिक

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -