घरताज्या घडामोडीप्रोजेक्ट चांगला आहे की वाईट? याबाबत तज्ज्ञांनी बोलावं, रिफायनरी प्रकल्पावरून केसरकरांचं मोठं वक्तव्य

प्रोजेक्ट चांगला आहे की वाईट? याबाबत तज्ज्ञांनी बोलावं, रिफायनरी प्रकल्पावरून केसरकरांचं मोठं वक्तव्य

Subscribe

उदय सामंत हे प्रकल्प ग्रस्तांना निश्चितपणे आतापर्यंत भेटलेले आहेत. पुढे सुद्धा ते भेटत राहतील. परंतु आलेल्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करायचा. एनरॉनमध्ये अशाच प्रकारचा विरोध झाला. परंतु तिकडे एकाही आंब्याच्या झाडाचं नुकसान नाही झालं. एनरॉन गरम पाणी समुद्रात सोडणार आणि मासे मरणार असं म्हटलं जात होतं. परंतु एकही मासा मेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे तो प्रोजेक्ट चांगला आहे की वाईट?, याबाबत तज्ज्ञांनी बोलावं. तज्ज्ञांनी त्याचं परिक्षण करावं, असं मोठं विधान दीपक केसरकर यांनी केलं आहे.

ज्या ठिकाणी लोकांची तयारी आहे तिथे आम्ही रिफायनरी प्रकल्प करण्यास तयार आहोत, असं उद्धव ठाकरे स्वत: बोलले आहेत. मग आता हे काय वेगळं बोलतायत?, लोकांच्या विरोधात जाऊन काही करावं असं आम्ही म्हणत नाही. परंतु ९० टक्के लोकांचा पाठिंबा त्यांना असेल तर तो प्रकल्प पूर्ण होणार, असं दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या ३० हजार शिक्षकांची भरती होणार

जिल्हा परिषदेने संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आहे. रोस्टर पूर्ण केल्यानंतरच भरती प्रक्रिया करता येते. हा रोस्टर जिल्हा परिषदेच्या संदर्भात पूर्ण असतो. त्यामुळे ते जिल्हा परिषदेची भरती करण्याची प्रक्रिया लवकर करू शकतील अशी मला खात्री आहे. त्यामुळे महराष्ट्रातील शिक्षकांची उणीव दूर होईल, असंही दीपक केसरकर म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : उद्धव ठाकरेंचं मुळमुळीत भाषण अन् आदित्य ठाकरे पिल्लू; राणेंची ठाकरेंवर जहरी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -