Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी निलंबित

दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण, मुख्य वनसंरक्षक एम.एस.रेड्डी निलंबित

महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घेतली भेट

Related Story

- Advertisement -

दिपाली चव्हाण आत्महत्येप्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम.एस.रेड्डी यांचे अखेरीस निलंबन करण्यात आले आहे. रेड्डी हे मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट घेतली, या भेटीनंतर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाणने चार पानांची सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती. या चिट्ठीत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक एम.एस.रेड्डी यांचा उल्लेख करत मानसिक त्रास दिल्याचे दिपाली चव्हाणने म्हटले होते. यामुळे रेड्डी वादाच्या कचाट्यात सापडले आहेत. अखेर एम.एस रेड्डी यांचे अखेर निलंबन केले आहे.

आर.एफ.ओ. दीपाली चव्हाणने वारंवार शिवकुमार त्रास देत असल्याच्या तक्रारी वरिष्ठ अधिकारी एम.एस.रेड्डी यांच्याकडे केली होती परंतु एम.एस रेड्डी यांनी नेहमी घटनेची दखल घेतली नाही. दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चार पानांची चिठ्ठी लिहीली होती. यामध्ये विनोद शिवकुमार आणि व्याघ्र प्रकल्पाचे माजी क्षेत्र संचालक रेड्डी यांचे नाव नमूद करण्यात आले होते. दीपाली चव्हाणने असेही म्हटले आहे की, काही लोकांनी वरिष्ठांचे कान भरले असल्यामुळे मला त्रास दिला जात आहे. तसेच आपल्या आत्महत्येला शिवकुमार जबाबदार असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शिवकुमारला धारणी न्यायालयाने अटक करत सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. शिवकुमारला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याच्या शासकीय निवासस्थानी जाऊन तपास केला होता.

- Advertisement -

दीपालीने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये DFO विनोद शिवकुमार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. वरिष्ठ अधिकारी डीओपी विनोद शिवकुमार हे आपल्याला गावकरी आणि कर्मचाऱ्यांसमोर अश्लील शिवीगाळ करतात, रात्री बेरात्री भेटायला बोलवतात. त्यांच्या मनाप्रमाणे न वागल्यास वारंवार सस्पेंड करण्याची धमकी देतात. असे दिपालीने सुसाइट नोटमध्ये लिहिले आहे. तसेच यापूर्वी DFO विनोद शिवकुमार यांची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक रेड्डी यांच्याकडे तक्रार केली मात्र त्यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याला उल्लेख दिपाली यांनी सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.

यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांची घेतली भेट

डॅशिंग अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी वनाधिकारी रेड्डी यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी यासाठी आज मा. मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. राज्यातल्या आयाबहिणींना त्रास देणाऱ्या रोड रोमीयो बरोबरच सरकारी तसंच खाजगी कार्यालयांमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगला धडा शिकवण्यााची वेळ आहे. या राज्यात अशा गुन्ह्यांना आणि गुन्हेगारांना माफी नाही. सगळ्यांना शिक्षा मिळेल, कडक शिक्षा मिळेल. सगळ्या कार्यालयांमधल्या विशाखा समित्यांचा आढावा आम्ही घेणार आहोत. एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही. हा जिजाऊॅचा महाराष्ट्र आहे.

- Advertisement -

गुन्हेगार आणि त्याला वाचवायचा प्रयत्न करणाऱ्यांना कडक शिक्षा व्हायला पाहिजे. माझी विनंती आहे राज्यातील पोलिसांना, लोक कायदा हातात घ्यायची भाषा बोलतायत, लोकांचा कायद्यावर विश्वास बसेल असा धडा शिकवा एकेकाला. दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला आहे. त्यांनी स्वत:ला संपवलं, त्यांची आत्महत्या दुःखदायक आहे. या निमित्ताने मी राज्यातील आईबहिणींना वचन देऊ इच्छिते की लैंगिक अत्याचारात सामील असलेल्यांना कडक शासन होईल. हेच माझं वचन आहे. एकालाही सोडणार नाही, कुणाला त्रास असेल अशा महिलांनी महिला आयोगाकडे तक्रार करावी. मी रोज सर्व तक्रारींचा आढावा घेणार आहे.

आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाचा विजय – चित्रा वाघ

अखेर रेड्डीचे निलंबन झाले ‬डॅशिंग अधिकारी दिपाली चव्हाण घटनेत आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाचा हा विजय आहे. ‪हा न्याय ती जिवंत असतांना मिळाला असता तर कदाचित आज दिपाली आपल्यामध्ये असती ‬‪तिच्या जाण्याने RFO विशेषत: मेळघाटात काम करणार्यांच्या व्यथा समोर आल्या पण त्यासाठी दिपालीला गमवावं लागलं‬

- Advertisement -