घरताज्या घडामोडीमुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले, दीपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले, दीपाली सय्यदांचा राज ठाकरेंना टोला

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंग्याच्या मुद्द्यांवरुन आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मांडलेल्या भूमिकेवरून वाद निर्माण झाला आहे. येत्या ५ जून रोजी राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. मात्र, त्यांनी दौऱ्याची घोषणा केल्यापासून त्यांच्यावर विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी ट्विट करत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

पावसाचं कारण सांगून मैदान सोडले. भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले. अयोध्येचे कंत्राट अर्धेच मिळाले. मुन्नाभाईच्या नावाने महाराष्ट्राला मामू मिळाले, असे दीपाली सय्यद यांनी ट्विट करत म्हटले आहे.

- Advertisement -

पुस्तक वाचुन मत वाढत नाहीत. रेल्वेची बोगी बुकिंग करून पक्ष वाढत नाही. लांबचा पल्ला आहे, शिलेदारांचा विमा काढुन जा, भाषणाने लोकांची पोट भरत नाहीत. महाराष्ट्राची लेकर आहेत सुखरूप घेऊन जा सुखरूप घेऊन या. जय श्रीराम.., असं देखील दीपाली सय्यद म्हणाल्या.

- Advertisement -

राज ठाकरेंच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध दर्शविला आहे. राज ठाकरे यांनी प्रथम उत्तर भारतीयांची माफी मागावी, त्यानंतर अयोध्येत पाऊल ठेवावे, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे नेतेही अयोध्या दौऱ्यावरून राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आहेत.


हेही वाचा : नवजोत सिंग सिद्धूंना मोठा झटका, 34 वर्ष जुन्या प्रकरणात एक वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -