दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंच्या हत्येचा कट रचलेला; माजी पीएचा धक्कादायक आरोप

deepali sayed was made plot to kill raj thackeray alleged by bhausaheb shinde at ahmednagar

अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यावर माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा एकदा धक्कादायक आरोप केले आहेत. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत. दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टमधून होणारे सर्व व्यवहार बेकायदेशीर असून त्यांच्याकडे येणारा पैसा कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा असल्याचा गंभीर आरोप दीपाली सय्यद यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला. तसेच दीपाली सय्यद यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोपही भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. मात्र दीपाली सय्यद यांनी यासंदर्भातील आरोप फेटाळले आहेत.

अभिनेत्री दीपाली सय्यद भोसले यांनी ट्रस्टच्या माध्यमातून राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. ज्यात ५० लोकांना ५० हजारांचे चेक देण्यात आले, जे चेक बनावट असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे दीपाली सय्यद भोसले चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ७०० ते ८०० कोटी रुपयांचा व्यवहार झाला हा सर्व पैसा आला कोठून याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. इतकेच नाही तर राज्य सरकारने आपल्याला संरक्षण दिल्यास दीपाली सय्यद यांचे दाऊदसोबतच्या संबंधांचे सर्व पुरावे आपण सरकारला आणि माध्यमांना देऊ असही शिंदे म्हणाले.

भाजपचे खासदार बृज भूषण शरण सिंग यांची भेट घेऊन मनसे प्रमुख राज ठाकरे यांची हत्या करण्याचा कट दीपाली सय्यद यांचा होता असा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला आहे. अयोध्या दौऱ्यात भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांना सय्यद उचकावत होत्या, यासाठी त्यांना एका मोठ्या नेत्याचा आधार होता, असा आरोपही शिंदे यांनी केला आहे.


लम्पीवर सप्टेंबर २०२३ पर्यंत महाराष्ट्रात लस येणार, राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा