दिपाली सय्यदांची भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका, म्हणाल्या…

Deepali Sayyed criticizes BJP leader Kirit Somaiya

राज्यात राज्यसभा निवडणुकीमुळे राज्याचे राजकारण तापले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर टीका केली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी किरीट सोम्मयांवर निशाना साधला असून भाजपवर टीका करताना शिवसेना जिंकेल यांचा विश्वास व्यक्त केला आहे.

आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने पैसे उतरवाल –

चिरीट तोम्मया आमदार शिवसेनेला मतदान करतीलच पण विश्वास तुमच्यावर नाही. दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगुन हॅलिकॅाप्टरने उतरवाल यांत शंका नाही.पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलहीस, असे म्हटले आहे. दिपाली सय्यद यांनी ट्विट केले आहे.

बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबते –

दिपाली सय्यद यांनी ट्विटरच्या माध्यमातून भाजपवर टिका केली आहे. दिल्लीतल्या बापाला प्रतिउत्तर केले तर यांना झोंबत असते. जेव्हा यांचे किरीट बोंबलत फिरते तेव्हा कमळाबाई कुठे लपुन बसते. लबाड लांडगा ढोंग करतंय, महाराष्ट्र प्रेमाच सोंग करतंय. महाराष्ट्रद्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.

सध्या दिपाली सय्यद विरुद्ध भाजप असा सामना रंगत आहे. दिपाली सय्यद सातत्याने भाजपवर टीका करत आहेत. याआधी पंतप्रधानांबाबत आणखी एक विधान केले होते. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर परखड शब्दात टीका केली होती.