Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रDefeat Candidates : लाखांवर मते मिळूनही या उमेदवारांचा पराभव

Defeat Candidates : लाखांवर मते मिळूनही या उमेदवारांचा पराभव

Subscribe

राज्यातील 58 मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या विरोधात लाखांपेक्षा अधिकची मते मिळुनही 58 उमेदवारांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत. या निवडणुकांचा निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर झाला. या निकालामध्ये राज्यात महायुती सरकारने ऐतिहासिक विजय मिळवल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीने तब्बल 234 जागांवर विजय मिळवला आहे. तसेच याच्या अंतिम निकालामध्ये 288 पैकी 234 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर, महाविकास आघाडीला फक्त 50 जागा मिळाल्या आहेत. महायुतीमध्ये भाजपाला 132, शिवसेनेला57 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागा मिळाल्या आहेत. तर महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेला 20, काँग्रेसला 16 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा जिंकता आल्या आहेत. तसेच यामध्ये राज्यातील 58 मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या विरोधात लाखांपेक्षा अधिकची मते मिळूनही 58 उमेदवारांचा पराभव झाल्याचे पाहायला मिळाले आहे. (Defeat of these candidates despite getting lakhs of votes.)

हेही वाचा : Ram Satupte : “मी पाच वर्ष फार सहन केलं, तुमच्या फांद्या आवरा, नाहीतर…”, राम सातपुतेंची मोहिते-पाटलांसह जानकरांना ‘वॉर्निंग’

- Advertisement -

यंदा विधानसभेची निवडणूक एकतर्फी झाली असली, तरी अनेक मतदारसंघात काटाजोड लढती पाहावयास मिळाल्या आहेत. राज्यातील 58 मतदारसंघातील विजयी उमेदवारांच्या विरोधात लाखांपेक्षा अधिक मते मिळूनही 58 जणांना गुलालापासून वंचित राहावे लागल्याचे दिसून आले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सुनील टिंगरे, संग्राम थोपटे, धीरज देशमुख, राम शिंदे यांचा यामध्ये समावेश आहे. तसेच पुणे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या जिल्ह्यांमध्ये या उमेदवारांची संख्या जास्त असल्याचे दिसून येत आहे. तसेच संपूर्ण निकाल पाहता, शरद पवार यांच्या 22 उमेदवारांचा समावेश राज्यातील लाखांपेक्षा अधिकची मते घेऊन पराभूत झालेल्या 58 उमेदवारांमध्ये आहे. तर त्यापाठोपाठ काँग्रेसच्या 16 उमेदवारांचा देखील समावेश आहे.

हेही वाचा : Maharashtra Election Results 2024 : भाजपाच्या कमळावर 132 जागा, तर मित्रपक्षांच्या चिन्हांवर 9 विजयी

- Advertisement -

शरद पवार गटाचे 22 पराभूत उमेदवार

सुभाष पवार (मुरबाड, ठाणे)
सचिन दोडके (खडकवासला)
प्रशांत जगताप (हडपसर)
देवदत्त निकम (आंबेगाव)
अशोक पवार (शिरूर)
रमेश अप्पा थोरात (दौंड)
राहुल कलाटे (चिंचवड)
समरजीत घाटगे (कागल)
मानसिंगराव नाईक (शिराळा)
प्रभाकर घार्गे (माण)
शशिकांत शिंदे (कोरेगाव)
दीपक चव्हाण (फलटण)
दिलीप खोडपे (जामनेर)
माणिकराव शिंदे (येवला)
राणी लंके (पारनेर)
संदीप वर्षे (कोपरगाव)
प्राजक्त तनपुरे (राहुरी)
सतीश चव्हाण (गंगापूर)
चंद्रकांत दानवे (भोकरदन)
राहुल मोटे (परांडा)
विजय भांबरे (जिंतूर)
पृथ्वीराज साठे (केज)

काँग्रेसचे 16 पराभूत उमेदवार

पृथ्वीराज चव्हाण (कराड)
संजय जगताप (पुरंदर)
संग्राम थोपटे (भोर)
ऋतुराज पाटील (कोल्हापूर दक्षिण)
राहुल पाटील (करवीर)
भगीरथ भालके (पंढरपूर)
कुणाल पाटील (धुळे ग्रामीण)
बाळासाहेब थोरात (संगमनेर)
विलास औताडे (फुलंब्री)
धीरज देशमुख (लातूर ग्रामीण)
माणिकराव ठाकरे (दिग्रस)
राहुल बोंद्रे (चिखली)
गिरीश पांडव (नागपूर दक्षिण)
सुरेश भोयर (कामठी)
सतीश वारजूरकर (चिमूर)
मनोहर पोरेटी (गडचिरोली)

उद्धव ठाकरेंचे 7 पराभूत उमेदवार

के. पी. पाटील (राधानगरी)
सत्यजीत पाटील (शाहूवाडी)
राजू शिंदे (औरंगाबाद पश्चिम)
सुरेश बनकर (सिल्लोड)
दत्ता गोर्डे (पैठण)
विशाल कदम (गंगाखेड)
डॉ. सिद्धार्थ देवळे (वाशिम)

भाजप 4 पराभूत उमेदवार

राम सातपुते (माळशिरस),
राम शिंदे (कर्जत-जामखेड),
अर्चना पाटील (लातूर शहर),
मदन येरावार (यवतमाळ),
संग्रामसिंह देशमुख (कडेगाव पलूस)

अजित पवार गटाचे दोन पराभूत उमेदवार

सुनील टिंगरे (वडगाव शेरी)
संजयकाका पाटील (तासगाव)

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पराभूत उमेदवार

राजेंद्र राऊत (बार्शी)

इतर पक्ष/अपक्ष सात उमेदवार

संदीप पाचगे (मनसे- ठाणे)
क्षितिज ठाकूर (बविआ-नालासोपारा)
बाळाराम पाटील (शेकाप-पनवेल)
रणजीतसिंह शिंदे (अपक्ष-माढा)
असीफ रशीद (भासेपा-मालेगाव)
जे. पी. गावित (माकप-कळवण)
गणेश निंबाळकर (प्रहार-चांदवड)


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -