Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रEVM Controversy : पराभूत उमेदवारांची फेरमतमोजणीची मागणी

EVM Controversy : पराभूत उमेदवारांची फेरमतमोजणीची मागणी

Subscribe

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सध्या ईव्हीएमबाबत पराभूत उमेदवार हे आक्षेप घेत असताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे.

मुंबई : राज्यात नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असुन राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार बहुमतांनी निवडून आले आहे. मात्र अद्याप राज्यात सत्ता स्थापन झाली नसून राज्याच्या राजकारणात गोंधळ सुरू असलेले चित्र स्पष्ट दिसत आहे. तर दुसऱ्या बाजुला राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर सध्या ईव्हीएमबाबत पराभूत उमेदवार हे आक्षेप घेत असताना दिसत आहे. राज्यात अनेक ठिकाणी फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे. (Defeated candidates demand recount.)

हेही वाचा : Ajit Pawar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीबाबत काय निर्णय झाला? अजितदादांनी स्पष्टच सांगितलं

- Advertisement -

राज्यातील विधानसभेच्या निकालांनी अनेक प्रस्थापितांना पराभवाचा धक्का दिल्याचे दिसून आले आहे. या धक्क्यातून अद्याप सावरू न शकलेल्या उमेदवारांनी आता फेर मतमोजणीचा आग्रह धरला आहे. त्यासाठी पालघरमधील पाच आणि डोंबिवलीतील एक अशा सहा जणांनी रीतसर 27 लाख 37 हजारांचे शुल्क जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : जनतेचा कौल बदलला त्याला आम्ही काय करणार? अजितदादांचा बाबा आढाव यांना थेट प्रश्न

- Advertisement -

या उमेदवारांनी केले फेरमतमोजणीसाठी अर्ज

विक्रमगडमधील सुनील भुसारा यांनी एका मतपेटीसाठी 47200 रुपये याप्रमाणे 10 बुथच्या फेर मतमोजणीसाठी 472000 हजार रुपये रक्कम चलनाद्वारे जमा केली आहे.

बविआचे वसईचे उमेदवार हितेंद्र ठाकूर यांनी 18 बुथचे 849600 रुपये भरले आहेत.

बोईसरचे उमेदवार राजेश पाटील यांनी पाच बुथसाठी236000 रुपये जमा केले.

नालासोपाऱ्याचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनीही 10 बुथचे 472000 रुपये शुल्क भरले.

वसईमधील काँग्रेसचे विजय पाटील यांनी पाच बुथसाठी 236000 रुपये  भरले आहेत.

त्यामुळे सरकारकडे आता एकूण 22,65,600 रुपये जमा करण्यात आले आहेत.

हेही वाचा : Mahadev Jankar : “EVM हॅक करता येऊ शकते, आय एम अल्सो इंजिनियर, आय…”, महादेव जानकरांचा मोठा दावा

त्यामुळे या चारही मतदारसंघांतील पराभूत पाच उमेदवारांनी 22,65,600 रुपये फी भरून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या फेरमतमोजणीचा प्रस्ताव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. त्यामुळे या चार विधानसभा मतदारसंघांमध्ये फेर मतमोजणी केली जाणार आहे.


Edited By Komal Pawar Govalkar

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -