घरताज्या घडामोडीDeglur bypolls result: महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर विजयाच्या उंबरठ्यावर, ३८१२६ मतांनी आघाडीवर

Deglur bypolls result: महाविकास आघाडीचे जितेश अंतापूरकर विजयाच्या उंबरठ्यावर, ३८१२६ मतांनी आघाडीवर

Subscribe

नांदेडमधील देगलूर बिलोली पोटनिवडणूकीची मतदान प्रक्रिया पूर्ण होण्यास काही तास बाकी आहेत. जितेश अंतापूरकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या जितेश अंतापूरकर यांना संधी देण्यात आली होती. अंतापूरकरांनी आपल्या संधीचे सोनं करुन दाखवलं आहे. भरघोस मत अंतापूरकर यांना मिळाली आहेत. भाजपचे उमेदवार सुभाष साबणे यांच्यापेक्षा अंतापूरकर २६ व्या फेरीमध्ये ३८ हजार १२६ मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे अंतापूरकर यांचा विजय जवळपास निश्चितच मानला जात आहे.

देगलूर पोटनिवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेचे होती. महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी उमेदवार जितेश अंतापूरकर यांच्यासाठी प्रचार आणि सभा मेळावे घेतले होते. भाजप प्रदेशाध्यक्ष देखील त्यांचे उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्रचारासाठी तळ ठोकून देगलूरमध्ये होते. अखेर निवडणूक मतमोजणीचे काही तास राहिले असून महाविकास आघाडी विजयाच्या उंबरठ्यावर आहे. हा विजय माझा नसून महाविकास आघाडीचा असल्याचे जितेश अंतापूरकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

काँग्रेस नेते आणि मंत्री अशोक चव्हाण यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये काँग्रेसला जनतेनं कौल दिला आहे. एकंदरीत एक पॉझिटिव्ह वातावारण देशात तयार झालं आहे. हाच कल संपुर्ण देशात झालेल्या पोटनिवडणूकीत दिसत आहे. काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना चांगले यश मिळाले आहे. काँग्रेसनं हिमाचल प्रदेशमध्ये ३ जागा राखल्या आहेत. कर्नाटकात २ पैकी १ जागा काँग्रेसनं राखली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसची जागा होती आणि ती काँग्रेसलाच मिळाली आहे. परंतु पहिल्या पेक्षा अधिक लिड पाहायला मिळत आहे. मागच्या वेळी २२ हजाराच्या आसपास लीड होती आता ती ४० हजार पेक्षा जास्त असून पुढे जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्येही काँग्रेसनं आपली जागा राखली असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

लोकांचा महाविकास आघाडीवर विश्वास

भाजपने ज्या पद्धतीने प्रचाराची पातळी सोडून जोर लावला होता तो अजेंडा त्यांचा चालला नाही. आम्ही विकासाच्या मार्गाचा अजेंडा घेऊन चाललो आहे. आमचा विकासाचा अजेंडा आहे. आम्हाला व्यक्तीगत आरोप दोषारोप करणार नाही. आम्ही देगलूर मतदार संघाचा विकास करत राहील. लोकांनी महाविकास आघाडी आणि काँग्रेसवर विश्वास ठेवला आहे. या जिल्ह्यात शंकरराव चव्हाण यांच्या पुण्याईमुळे लोकांनी भक्काम साथ दिली असल्याचे अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : दादरा नगर हवेलीत शिवसेनेच्या कलाबेन डेलकर विजयी, शिवसेनेचा महाराष्ट्राबाहेर पहिला खासदार


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -