Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्यास उशीर झाला : उदयनराजे भोसले

कोश्यारींचा राजीनामा मंजूर करण्यास उशीर झाला : उदयनराजे भोसले

Subscribe

भगतसिंग कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांकडून याबाबत मत व्यक्त करण्यात येत आहे. यावर भाजपच्या गोटातील खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा आपले मत व्यक्त केले आहे. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यास तसा उशीर झाल्याची प्रतिक्रिया उदयनराजेंनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी असताना भगतसिंग कोश्यारी यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली. ज्यामुळे अनेकदा राज्यातील अनेक भागांमध्ये त्यांच्याविरोधात मोर्चे देखील काढण्यात आले. ज्यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी भगतसिंग कोश्यारी यांनी आपला पदाचा राजीनामा दिला होता. हा राजीनामा आता देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता अनेक राजकीय नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यास उशीर झाल्याचे सांगितले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी जर राज्यकारभारात लोकांचा समावेश केला नसता, तर आजही राजेशाही असती. सर्व धर्मातील लोकांना एकत्र घेऊन जाण्याची संकल्पना छत्रपती शिवरायांनी मांडली. जर महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर या देशाचे किती तुकडे होतील. जसं आता युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका आहे. तसंच युनायटेड स्टेट ऑफ इंडिया होईल.’

- Advertisement -

पूढे बोलताना उदयनराजे म्हणाले की, ‘खंत एवढीच वाटते की, वास्तविक राजीनामा मंजूर होण्यास उशीर झाला. वेळेत जर का निर्णय झाला असता तर बरंच काही सावरता आले असते. छत्रपतींचा आदर करणे आपले कर्तव्य आहे. त्यामुळे जे झाले ते चांगले आहे. ज्याप्रमाणे शासकीय कामकाजात रिटायरमेंटचे वय असते, त्याप्रमाणे राजकारणात सुद्धा आमदार, खासदार आणि वरिष्ठ पदावरील व्यक्तींना वय ठरवले गेले पाहिजे. कारण ज्याप्रमाणे आपण म्हणतो की, तरुणांना वाव दिला पाहिजे. पण ते होत नाही. त्यामुळे तरुणाईला वाव दिला पाहिजे.’

हेही वाचा – ‘या’ ४ वादग्रस्त विधानांमुळे वादात अडकले भगतसिंह कोश्यारी

- Advertisement -

‘जसं राष्ट्रपती देशाचा प्रमुख असतो, तसा राज्यपालही राज्याचा प्रमुख असतो. अशा महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींनी महापुरुषांबद्दल जबाबदारीनं वक्तव्य करणं अपेक्षित आहे. महापुरुषांबद्दल वाईट बोललं तर लोकांच्या भावना दुखावल्या जातात. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण होतो. हे कशा करता? जगात अनेक महाराजे होऊन गेले, पण शिवाजी महाराज आणि त्यांच्यात मोठा फरक होता. तो म्हणजे, ते महाराजे स्वत:च्या साम्राज्याठी लढले आणि आपल्या शिवाजी महाराजांनी युध्द केलं ते लोकांसाठी केले,’ असेही उदयनराजे भोसले यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले आहे.

- Advertisment -