घरCORONA UPDATEकोरोना व्हायरसच्या निकृष्ट दर्जाच्या टेस्टिंग किटमुळे तपासणीस विलंब - पश्चिम बंगाल

कोरोना व्हायरसच्या निकृष्ट दर्जाच्या टेस्टिंग किटमुळे तपासणीस विलंब – पश्चिम बंगाल

Subscribe

भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) राज्याला निकृष्ठ दर्जाचे टेस्ट उपलब्ध करून देत आहे, असे पश्चिम बंगाल सरकारचे म्हणणे आहे.

भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (आयसीएमआर) राज्याला निकृष्ठ दर्जाचे टेस्ट उपलब्ध करून देत आहे, असे पश्चिम बंगाल सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाची टेस्ट पुन्हा पुन्हा करावी लागत आहे. आणि टेस्टचे रिपोर्ट उपलब्ध होण्यासाठी उशीर होत आहे. एनडीटीव्हीच्या रिपोर्ट नुसार, राज्य सरकारने आयसीएमआरला कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी सांगितले आहे. कारण टेस्टमध्ये होणाऱ्या उशीरमुळे कोरोनाची लढाई कमजोर होऊ नये. पश्चिम बंगाल सरकारने लावलेल्या आरोपांवर आयसीएमआरतर्फे कोणतेही उत्तर आलेले नाही.

कोलकाताच्या आतडी रोग संस्था (एनआयसीईडी)चे दिग्दर्शक डॉ. शांता दत्ता म्हणाले की, हे अतिशय दुर्दैवी आहे की, अचूक परिणाम मिळविण्यासाठी किट प्रमाणित केलेले नाही. प्रत्येक मेडिकल कॉलेजसाठी खूप कठीण काम आहे. पहिल्यांदा या किटच्या गुणवत्ता तपासली गेली पाहिजे. पहिल्यांदा किट पुण्यात बनविले जात होते. जेव्हा मागणी वाढत गेली तेव्हा सरकारला बाहेरून मागवुन विविध ठिकाणी पाठविण्यात आले.

- Advertisement -

राज्याचे स्वास्थ्य आणि परिवार कल्याण विभागने रविवारी आयसीएमआरला या मुद्द्याची तात्काळ तपासणी करण्यासाठी सांगितले आहे. पश्चिम बंगालमध्ये स्वाब नमुन्याच्या परीक्षणात उशीर होत असून सोशल मीडियावर फिरणाऱ्या रिपोर्टवर खुलासा देण्यात आला आहे. साधारण दोन आठवड्या पूर्वी आयसीएनआय – एनआयसीइइडीद्वारे पाठवलेली किट मोठ्या संख्येने यानिर्णायक परिणाम देत होती. त्यामुळे पुन्हा नमुने तपासणी करण्यासाठी पाठविले जात होते. त्यामुळे अंतिम अहवाल येण्यासाठी खूप कालावधी लागत होता. इंडिया टूडे यांच्या अहवालानुसार, कोलकत्ताच्या एनआयसीइडीचे म्हणणे आहे की, राज्य सरकार टेस्टसाठी पर्याप्त नमुने पाठवत नव्हती. यावेळी, एनआयसीइडी सांगितले की, यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक दिवशी साधारण २० नमुने ही येत नव्हते. आमच्याकडे पाठविण्यात येणाऱ्या नमुन्याच्या संख्या राज्य सरकार ठरविते. त्यामुळे त्यांनी अधिक नमुने पाठवले तर जास्त टेस्ट करू शकतो. बंगालमध्ये केल्या जाणाऱ्या टेस्टची संख्या खूप कमी आहे.

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आयसीएनआरने आतापर्यंत एनआयसीइडीला ४२ हजार ५०० टेस्ट किट पाठविले आहे. यात कोणतीही कमतरता नाही.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांचे मुख्य सचिव राजीव सिन्हा म्हणाले की, शनिवारी ४ हजार ६३० नमुन्यांचे परीक्षण करण्यात आले आहे. आणि बंगाल प्रत्येक दिवसाच्या हिशोबाप्रमाणे ४०० हुन अधिक टेस्ट करत आहे.

स्वास्थ्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये कोरोनाचे आतापर्यंत ३१० प्रकरणे पुढे आली असून यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -