घरताज्या घडामोडीदिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल 'मातोश्री'वर; उद्धव ठाकरेंशी 'या' मुद्द्यांवर होणार चर्चा

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल ‘मातोश्री’वर; उद्धव ठाकरेंशी ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा

Subscribe

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज रात्री ७:३० वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान भेट घेणार आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आज रात्री ७:३० वाजता मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. अरविंद केजरीवाल यांच्यासह पंजाबचे आपचे मुख्यमंत्री भगवंत मान भेट घेणार आहेत. या बैठकीत आगामी काळातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि नुकताच निवडणूक आयोगाने दिलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या निर्णयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. (Delhi CM Arvind Kejriwal And Bhagwant Mann Will Meets Uddhav Thackeray Today At Matoshree In Mumbai )

अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान हे दोघेही एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. अशातच आज उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांना चहापानासाठी बोलवल्याचे समजते. असे असले तरी त्यांची ही भेट राजकीय मानली जात आहे. कारण आगामी काळाताली निवडणूका लक्षात घेता भाजपाचा पराभव कसा करायचा यावर या भेटीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

याशिवाय, या बैठकीत २०२४ मध्ये मोदींना रोखायचे कसे? याबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मिळते. तसेच, काँग्रेसला सोबत घेऊन पुढची लोकसभा लढवायची असाही मुद्दा यावेळी चर्चेत येऊ शकतो, असेही बोलले जात आहे.

दरम्यान, मार्च महिन्यात देशभरातील विरोधीपक्षांची सभा आयोजित करण्यात येणार आहे. याचे नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत. निवडणूक आयोगानं शिवसेनेची सूत्र अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडं सोपवल्यानंतर उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोग तसेच केंद्रातील भाजप सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठी त्यांनी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषदेत घोषणा केली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘ती भांडखोर आहे…’, रुपाली ठोंबरेंबाबत शरद पवारांचे स्पष्ट वक्तव्य

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -