घरदेश-विदेशदिल्लीत ऑक्सिजनअभावी एका डॉक्टरसह आठ रुग्णांचा मृत्यू

दिल्लीत ऑक्सिजनअभावी एका डॉक्टरसह आठ रुग्णांचा मृत्यू

Subscribe

देशात सध्या कोरोना संसर्गाचा उद्रेक होताना दिसत असून दररोज लाखांच्या संख्येत कोरोनाबाधित वाढत असून, रूग्णांच्या मृत्यू संख्येतही मोठी वाढ होत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली असून, रूग्णालयांमध्ये ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन, औषध तुटवडा निर्माण झालेला आहे. परिणामी रुग्णांचे हाल सुरू आहेत. अनेक ठिकाणी रुग्णांना वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने रुग्णांच्या मृत्यूच्या देखील घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना दिल्लीत घडल्याचे समोर आले आहे. येथील बत्रा हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनअभावी एका डॉक्टरसह आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयात बत्रा हास्पिटलकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे की, रुग्णालयात सध्या ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असून, तासभरापेक्षा जास्त काळ ऑक्सिजन पुरवठा होत नाही. यामुळे एका डॉक्टरसह आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला वेळेत ऑक्सिजन मिळत नाही. आमच्याकडे दुपारी 12 वाजता ऑक्सिजन संपला होता. त्यानंतर आम्हाला दीड वाजता ऑक्सिजन मिळाला. परिणामी आम्ही आमच्या एका डॉक्टरसह रुग्णांचा मृत्यू झाला. यावर उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला निर्देश दिले आहेत की, कोणत्याही परिस्थितीत आज 490 मेट्रिक टन ऑक्सिजन पोहोचली पाहिजे. जर याचे पालन केले गेले नाही तर न्यायालय अवमानाची कारवाई करू शकते.

- Advertisement -

जर हे काम पूर्ण झाले नाही तर डीपीआयटीच्या सचिवास पुढील सुनावणीत न्यायालयासमोर हजर व्हावे लागेल.कोरोना संकट काळात दिल्लीतील रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झालेला आहे. उच्च न्यायालयातील एका सुनावणी दरम्यान दिल्लीतील बत्रा हॉस्पिटलकडून हे देखील सांगण्यात आले की, त्यांच्याकडे अत्यंत कमी प्रमाणात ऑक्सिजन उपलब्ध आहे. आम्ही दररोज काही तास संकटात घालवत आहोत, हे चक्र थांबतच नाही. आम्ही एका व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर देखील ऑक्सिजनसाठी विनंती केली, जो कालच ऑक्सिजन पुरवठादार, दिल्ली सरकारमधील अधिकारी आणि रुग्णालयांच्या प्रतिनिधीनी मिळून बनवला आहे. त्यावर आम्हाला प्रतिसाद मिळाला की, आम्हाला आता ‘डिस्टर्ब’ करू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -