घरताज्या घडामोडीदिल्ली निकालांनंतर चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेला जाहीर आव्हान!

दिल्ली निकालांनंतर चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेला जाहीर आव्हान!

Subscribe

दिल्ली निवडणुकांमध्ये काँग्रेसनं आपली मतं आपकडे ट्रान्सफर केली, असा दावा करत चंद्रकांत पाटील यांनी दुसरीकडे शिवसेनेला आव्हान दिलं आहे.

दिल्लीच्या विधानसभा निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने भाजपच्या मनसुब्यांना सुरूंग लावत तिसऱ्यांदा दिल्लीत दणक्यात विजय साजरा केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातल्या भाजप नेत्यांची फौज दिल्लीत जाऊन देखील भाजपला जागांमध्ये भरीव वाढ करता न आल्याचं शल्य आता भाजप नेत्यांच्या वक्तव्यांमधून दिसून येत आहे. मात्र, त्यासंदर्भात बोलताना भाजपचे राज्यातील प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिलं आहे. शिवाय, भाजपला एकटं पाडण्यासाठी सगळं होत असल्याचा आरोप देखील पाटील यांनी यावेळी केला. त्यामुळे आता त्यावर शिवसेनेकडून काय उत्तर दिलं जातंय, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे.

‘आमचं चॅलेंज आहे…’

दिल्लीतल्या पराभवाविषयी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘आमच्या दिल्लीत ३ जागा होत्या. त्यावरची प्रत्येक जागा हा आमचा विजयच आहे. निवडणुकीत प्रत्येक पक्षाने आपली ताकद लावायची असेल. पण भाजपला देशभरात एकटं पाडण्यासाठी वाट्टेल ती तडजोड करण्याची तयारी लोकांनी चालवली आहे. महाराष्ट्र हे त्याचं उदाहरण आहे. आमचं देशभरातल्या पक्षांना चॅलेंज आहे. महाराष्ट्रात वेगवेगळे लढा. नवी मुंबईत वेगवेगळे लढा. कॉमन मिनिमम प्रोग्रॅमवर सगळ्यांनी ताकद एकत्र करणं आणि त्याशिवायचे सगळे मुद्दे सोडून देणं हे योग्य नाही’, असं पाटील म्हणाले.

- Advertisement -

‘काँग्रेसनं मतं ट्रान्सफर केली’

दरम्यान, यावेळी पाटील यांनी काँग्रेसला देखील टार्गेट केलं. ‘ज्या दिल्लीत १५ वर्ष काँग्रेसनं राज्य केलं, त्या काँग्रेसला फक्त ४ टक्के मतं मिळतात. ही काँग्रेसनं व्होटबँक ट्रान्सफर केली आहे. दिल्लीत आम्ही नेहमीच ३३ टक्के मतांवर असायचो. त्यात आमची वाढच झाली असेल. काँग्रेस एकेकाळी इथला राज्यकर्ता पक्ष असूनदेखील त्यांची मतं ४ टक्क्यांवर आली आहेत. तिथे या विजयाचं गणित आहे.


हेही वाचा – केजरीवालांनी देशाला जन की बात दाखवली-उद्धव ठाकरे
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -