Sunday, June 13, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश दिल्ली निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपचे स्टार प्रचारक जाणार!

दिल्ली निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून भाजपचे स्टार प्रचारक जाणार!

भाजपचे महाराष्ट्रातील स्टार प्रचारक दिल्लीमध्ये निवडणुकीत प्रचारासाठी जाणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ८ ते १० दिवस हे नेते दिल्लीतच तळ ठोकून बसणार आहेत.

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते दिल्ली येथे होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीकडे. येत्या ८ फेब्रुवारीला दिल्लीमध्ये होणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये एक हाती सत्ता असलेल्या आम आदमी पक्षाला धक्का देण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. भाजप दिल्ली विधानसभा काबीज करण्याचा मनसूबा आखत आहे. त्याचमुळे आता भाजपने विविध राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी दिल्लीमध्ये बोलावले आहे. याचमुळे आता भाजपचे महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते आता दिल्लीमध्ये प्रचारासाठी जाणार असून, हे नेते दिल्लीत प्रचार करणार आहेत.

प्रचारासाठी जाणार ‘हे’ नेते

दरम्यान, दिल्लीमध्ये प्रचारासाठी महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विनोद तावडे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, रविंद्र चव्हाण असे एकूण महाराष्ट्रातील २५ प्रमुख नेते प्रचारासाठी जाणार आहे. विशेष म्हणजे या सर्व नेत्यांना प्रत्येकी दहा-दहा विभाग देण्यात आले असून, हे सर्व नेते दिल्लीमध्ये प्रचार करणार आहेत. भाजपचे काही प्रमुख नेतेच प्रचारासाठी जाणार नाहीत, तर भाजपचे काही आमदार आणि खासदार देखील दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, याबाबत भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांना विचारले असता त्यांनी ‘नेहमीच निवडणुका असल्यानंतर भाजप ताकदीने उतरत असते. तसेच कोणत्याही राज्यात निवडणूक असली, तर विविध राज्यातील नेते हे त्या-त्या ठिकाणी जाऊन प्रचार करत असतात’, असं सांगितलं.

- Advertisement -

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे ग्राऊंड लेव्हलला काम करणारे कार्यकर्ते आहेत, ते देखील दिल्लीमध्ये आठ ते दहा दिवस तळ ठोकणार असून, हे कार्यकर्ते दिल्लीमध्ये ग्राऊंड लेव्हलला काम करणार आहेत. तसेच हे कार्यकर्ते दिल्लीमध्ये घरोघरी जाऊन पक्षाचा प्रचार करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत आहे.

- Advertisement -