घरमहाराष्ट्र'शेतकऱ्यांचे पैसे थकवण्यामध्ये दिल्लीचा लैकिक'

‘शेतकऱ्यांचे पैसे थकवण्यामध्ये दिल्लीचा लैकिक’

Subscribe

दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे पैसे थकवले जातात अशी माहिती शरद पवार यांनी दिली. ते पुण्यामध्ये बोलत होते.

प्रत्येक शहराचा कोणत्या तरी कारणासाठी नाव लौकिक असतो. राजकारणाचा केंद्रबिंदु म्हणून दिल्लीकडे पाहिले जाते. पण, शेतकऱ्यांचे पैसे थकवण्यामध्ये देखील दिल्लीचा नावलौकिक असल्याची माहिती माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी दिली. पुण्यामध्ये आयोजित महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाच्या ५८व्या वार्षिक मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अनेक मान्यवर देखील हजर होते. यावेळी बोलताना शरद पवारांनी दिल्लीतील आपले अनुभव सांगितले. जुन्नरसह आणखी काही शेतकऱ्यांचे पैसे दिल्ली बाजारपेठेतून मिळाले नाहीत. मी दिल्लीमध्ये असताना अनेक शेतकरी याबद्दल तक्रारी घेऊन येत. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळाले पाहिजेत. याबद्दल कायदे कठोर करण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी बोलून दाखवले. तर आंतरराष्ट्रीय दर्जेदार द्राक्ष निर्यात करणारा देश म्हणून भारताने विश्वास संपादन करावा असे देखील शरद पवार यांनी बोलून दाखवले.

द्राक्ष उत्पादनावर लक्ष देण्याची गरज

राज्यामध्ये द्राक्षाचे क्षेत्र वाढत आहेत. त्याप्रमाणे समस्याही वाढत आहेत. शास्त्रज्ञांना या अडचणी समजल्या पाहिजेत. त्यांनी केलेले संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यातुन द्राक्षाची गुणवत्ता वाढेल. तसेच उत्पादनातही वाढ होईल. यावेळी बोलताना केंद्र शासनाकडून राज्यातील द्राक्ष उत्पादकांना अनुदान मिळण्यास अडचणी येतात. त्याचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन शरद पवारांनी दिले. द्राक्षांचा विचार करता आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भारताचा वाटा ६ ते ७ टक्केच आहे. त्यामध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे ऊसाला पर्यायी पिकाचा देखील विचार सुरू आहे. याबद्दल मी ऑक्टोबरमध्ये इटली,फान्स,जर्मनी देशांना भेट देणार असल्याची माहिती देखील पवारांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -