घरताज्या घडामोडीआरक्षणाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी

आरक्षणाची मर्यादा वाढवून देण्याची मागणी

Subscribe

छत्रपती संभाजीराजे - मराठा आरक्षणप्रश्नी थोड्याच वेळात राष्ट्रपतींना भेटणार

मराठा समाजाचे आरक्षण वाढवून देण्यासाठी एकूण आरक्षण मर्यादा वाढवून देण्याची मागणी आपण राष्ट्रपतींकडे करणार असल्याची ग्वाही खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी दिली. संभाजी राजे आज काही वेळातच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे सर्वांचेच लक्ष या भेटीकडे लागून आहे.

मराठा आरक्षणाचा तिढा गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याने, अखेर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी हा प्रश्न मांडण्यासाठी थेट राष्ट्रपतींची वेळ घेतलीय. काही वेळातच संभाजी राजे आणि राष्ट्रपती यांच्यात भेट होणार आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यभरातील राजकीय वातावरण तापलेले आहे. याच मुद्द्यावरून मराठा संघटनांनी आंदोलनाचा इशारादेखील दिला आहे. त्यामुळे संभाजी राजे आणि राष्ट्रपतींच्या भेटीचं फलित काय असेल, याकडे आता मराठा समाजासह राजकीय वर्तुळाचंही लक्ष लागून आहे.

- Advertisement -

शिष्टमंडळात चारही प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी

मराठा आरक्षणाबाबतच्या चर्चेसंदर्भात राष्ट्रपतींना आपण पत्र दिले होते. त्यानुसार ही वेळ मिळाली आहे. या भेटीच्या पार्श्वभूमीवर संभाजीराजे यांनी राज्यातील चारही प्रमुख पक्षांना प्रतिनिधी पाठवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार शिवसेनेने खासदार विनायक राऊत, भाजपने रणजितसिंह नाईक-निंबाळकर, राष्ट्रवादीने वंदना चव्हाण, तर, काँग्रेसने संग्राम थोपटे यांना या चर्चेसाठी पाठवले आहे. हे शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहे. राष्ट्रपतींच्या भेटीपूर्वी संभाजीराजे आणि शिष्टमंडळातील अन्य नेत्यांची एक बैठक झाली. त्यात सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती खासदार छत्रपती संभाजीराजेंनी ट्विटरद्वारे दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -