नोटाबंदी म्हणजे आर्थिक हत्याकांड, त्याला जबाबदार कोण? संजय राऊतांचा SC ला सवाल

Demonetization is a financial massacre | नोटाबंदीमुळे अनेकांनी रोजगार गमावला. रोजगार गेल्यामुळे लाखो लोकांनी आत्महत्या केल्या. या आर्थिक हत्याकांडाला जबाबदार कोण, याचं उत्तर न्यायालयाने दिलं नाही. त्याचा फायदा काय झाला, कोणाला झाला, याचं उत्तर न्यायालायने द्यावं, असं संजय राऊत म्हणाले.

sanjay raut

Demonetization Valid | मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली नोटाबंदी वैध होती, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिला आहे. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी सर्वोच्च न्यायालयालच प्रश्न विचारले आहेत. नोटाबंदीमुळे बेरोजगारी आली, हजारो लोकांचे प्राण गेले, याला जबाबदार कोण? असा सवाल विचारत नोटाबंदी हे आर्थिक हत्याकांड होतं, अशी सणसणीत टीकाही राऊतांनी केली. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा 2016ची नोटाबंदी वैध, सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दिलासा

संजय राऊत म्हणाले की, नोटाबंदी हे आर्थिक हत्याकांड होतं. नोटाबंदीमुळे बेरोजगारी निर्माण झाली. हजारो लोक बँकांच्या रांगेत मरण पावली. नोटाबंदीमुळे अनेकांनी रोजगार गमावला. रोजगार गेल्यामुळे लाखो लोकांनी आत्महत्या केल्या. या आर्थिक हत्याकांडाला जबाबदार कोण, याचं उत्तर न्यायालयाने दिलं नाही. त्याचा फायदा काय झाला, कोणाला झाला, याचं उत्तर न्यायालायने द्यावं, असं संजय राऊत म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अचानक येऊन सांगितलं की पाचशे आणि हजाराच्या नोटा आजपासून बंद. यामुळे काळापैसा वाचेल. टेरर फिंडिंग बंद होईल. चलनातील बनावट नोटा संपून जातील, असं त्यावेळी सांगण्यात आलं होतं. मात्र, झालं उलटंच. बनावट नोटांचं प्रमाण वाढलंय, काश्मीरसह देशभरात दहशतवाद कमी झाला नाही. काळा पैसा वाढला, मग नोटाबंदी वैध कशी? असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा – नोटाबंदीवरील सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आणि नोटसम्राट

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना परत पाठवा. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा व्यक्ती राजभवनात कसं काय बसू शकते? संभाजी महाराज स्वराज्यरक्षक, धर्मवीर, महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत आहेतच. पण त्यांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरुष आहेत. त्यांचा अपमान हे विसरतात कसे? पण, आधी शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात न्याय होईल. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे आणि त्यांचे दोन्ही गटाने शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात रस्त्यावर उतरावं. आज उतरले आहेत. त्याचं आम्ही स्वागत करतो, असंही संजय राऊत म्हणाले.