Monday, April 12, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र फलटण ते लोणंद मार्गे पुण्याकडे जाणा-या डेमू ट्रेन रवाना

फलटण ते लोणंद मार्गे पुण्याकडे जाणा-या डेमू ट्रेन रवाना

पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणे या प्रदेशासाठी एक वरदान ठरणार आहे.

Related Story

- Advertisement -

रेल्वेमार्ग हा वाहतूकीचा सर्वांत सोपा आणि स्वस्त मार्ग आहे. फलटण ते पुण्यादरम्यान लोणंद मार्गे रेल्वेगाडी सुरू झाल्याने या भागातील लोकांना आणि शेतक-यांना नवीन बाजारपेठेत पोहोचण्यास, विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कामगारांना अधिक रोजगार मिळण्यास मदत होईल. पुणे ते फलटण दरम्यान लोणंदमार्गे थेट संपर्क असणे या प्रदेशासाठी एक वरदान ठरणार आहे. यामुळे फलटणमधील रहिवाशांना फलटण ते पुणे आणि परत अशी थेट प्रवासी रेल्वे कनेक्टीवीटी मिळेल. या सर्व बाबी लक्षात घेऊन श्री प्रकाश जावडेकर, पर्यावरण, वन व हवामान बदल, माहिती व प्रसारण, अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री, भारत सरकार यांनी ३० मार्च २०२१ रोजी नवी दिल्लीहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे फलटण ते लोणंदमार्गे पुणे या डेमू ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले.

श्री प्रकाश जावडेकर यावेळी म्हणाले की, माननीय रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री श्री पीयूष गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वेमध्ये व्यापक बदल दिसतात. बायो-टॉयलेट्सच्या परिचयामुळे ट्रॅक आणि स्टेशन प्लॅटफॉर्म स्वच्छ झाले आहेत. स्वच्छ भारत यांचे हे एक आदर्श उदाहरण आहे. तसेच, रेल्वेमंत्री म्हणून श्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वात आयआरसीटीसीवरील आरक्षणामुळे प्रवाशांना तिकिटे जलद मिळण्यास मदत झाली असेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च मानकाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मानवरहित रेल्वेमार्ग क्रॉसिंगचे उच्चाटन, विद्युतीकरणाची प्रगती, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण, रेल्वेची बंदर कनेक्टिव्हिटी या पायाभूत सुविधांमुळे अर्थव्यवस्था व विकासाला चालना मिळाली आहे. ५००० हून अधिक रेल्वे स्थानकांत वाय-फाय प्रदान करण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांना वर्ल्ड वाईड वेबवर जाता येईल आणि त्यांचे ज्ञानाचे क्षितिज उघडले जाईल.

- Advertisement -

या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये श्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील,  श्री छत्रपती उदयनराजे भोसले,  श्री चंद्रकांत (दादा) पाटील, श्री सुनील कांबळे, माननीय आमदार आणि श्रीमती नीता नेवासे, नगराध्यक्षा, फलटण या प्रसंगी व्हिडिओ लिंकद्वारे सामील झाल्या. श्री. सुनीत शर्मा, अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड; श्री पुनेंदू मिश्रा, सदस्य (परीचालन व व्यवसाय विकास -ओ अँड बी डी), रेल्वे बोर्ड, नवी दिल्लीहून सामील झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री संजीव मित्तल यांनी स्वागत केले आहे.


हेही वाचा – मोठी बातमी! परमबीर सिंग यांच्या आरोपांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार

- Advertisement -