घरमहाराष्ट्रडेंग्यू-मलेरिया संसर्गित रक्ताची फार्मा कंपन्यांना विक्री

डेंग्यू-मलेरिया संसर्गित रक्ताची फार्मा कंपन्यांना विक्री

Subscribe

राष्ट्रीय जैविक संस्थेच्या नियमांची पायमल्ली केली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. डेंग्यू आणि मलेरिया पॉझिटिव्ह रुग्णांचे तपासणीसाठी घेतलेल्या रक्ताचे नमुने हे फार्मा कंपनीला हजारो रुपयांना विकले जातं आहे.

डेंग्यू-मलेरिया या आजारातील पॉझिटीव्ह रुग्णांच्या रक्तांचे नमुने हजारो रुपयांना फार्मा कंपन्यांना विकले जात असल्याची धक्कादायक बाब समोर येत असून गेले कित्येक वर्षे हा अनागोंदी कारभार चालत आहे. पण, याची कल्पना संबंधित सरकारी यंत्रणेला नाही की यंत्रणा मुद्दाम अज्ञानतेचे ढोंग घेऊन आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

डेंग्यू-मलेरियासारख्या साथरोगांनी सध्या थैमान घातले असून त्याच्या निदानासाठी तपासणी किट तयार केली जातात. हे तपासणी किट राष्ट्रीय जैविक संस्थेच्या नियम निकषांनीच तयार करावी लागतात. पण, खासगी फार्मा कंपन्या हे तपासणी किट सर्रास विकत असतात. हे तपासणी किट दर्जेदार असल्याचं दर्शवण्यासाठी पॉझिटिव्ह डेंग्यू-मलेरिया रक्ताचे नमुने त्या खासगी फार्मा कंपन्यांना दाखवावे लागते. त्यामुळे, डेंग्यू, मलेरिया पॉझिटिव्ह रुग्णांचे तपासण्यासाठी घेतलेल्या रक्तापैकी अतिरिक्त रक्त हे फार्मा कंपन्याना हजारो रुपयांना विकले जाते.

- Advertisement -

त्यानुसार, मलेरिया आणि डेंग्यू संसर्गित रुग्णाचे रक्त मुंबई आणि राज्यातील विविध परिसरातून पॅथॉलॉजीच्या माध्यमांतून तपासणी किट तयार करणाऱ्या कंपन्यांना विकले जात असल्याची तक्रार आता राष्ट्रीय जैविक संस्था, अन्न आणि औषध प्रशासन विभाग आयुक्त सचिव यांच्याकडे करण्यात आली आहे. नियमाने बायोमेडिकेल वेस्टमध्ये हे रक्त नष्ट करणे कायदेशीर बंधनकारक आहे. पण, असं न होता रक्त सर्रास फार्मा कंपन्यांना विकले जाते.

“हा धक्कादायक प्रकार कित्येक वर्षांपासून सुरू आहे. पण, याकडे कोणीही लक्ष देत नाही. या गंभीर प्रकाराला चाप बसवण्यासाठी राष्ट्रीय जैविक संस्था, एफडीए आयुक्त आणि सचिवांकडे तक्रार करण्यात आली आहे. यावरून त्या तपासण्या किटचा दर्जा तसंच इतर रुग्णांच्या आरोग्याला घातक आहे.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -