घरताज्या घडामोडीदेवळा मुद्रांक प्रकरण : अखेर बनावट दस्ताद्वारे झालेली शेतजमीन खरेदीची नोंद रद्द

देवळा मुद्रांक प्रकरण : अखेर बनावट दस्ताद्वारे झालेली शेतजमीन खरेदीची नोंद रद्द

Subscribe

बनावट मुद्रांकाव्दारे शेतजमीन लाटल्याप्रकरणी खोट्या दस्ताद्वारे झालेल्या शेतजमीन खरेदीची नोंद रद्द करून सदरच्या जमीनीवर पुन्हा मुळमालकाचे नाव लावण्यात यावे याबाबतचा सातबारा तात्काळ देण्यात यावा असे आदेश चांदवड उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी दिले आहे. सदर प्रकरणातील मुद्रांक विक्रेता पंधरा दिवस उलटूनही अद्याप फरार आहे.

तालुक्यातील शेतकरी भास्कर निकम यांची मेशी शिवारातील वडिलोपार्जित शेतजमीन बनावट मुद्रांकाव्दारे दस्त तयार करून लाटण्याचा प्रकार नुकताच उघडकिस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. वडिलांचे निधन झाल्यास भास्कर निकम हे मिळकतीवर वारस नोंद करण्यासाठी तलाठी कार्यालयात गेले असता या मिळकतीवर अगोदरच नाव लावण्यासाठी एक अर्ज दाखल असल्याची माहिती त्यांना समजली. इतकेच नव्हे तर या कागदपत्राच्या आधारे संबधितांचे नावही लावण्यात आल्याचे निदर्शनास आले. या मिळकतीची विक्री झालेली नसतांना २०१२ मध्येच जमिनीची विक्री झाल्याचे तलाठी कार्यालयात झालेल्या नोंदीवरून दिसून आले. या खरेदी खताचा जो दस्त क्रमांक नमूद करण्यात आला आहे. तो लोहणेर येथील एका महिला शेतकर्‍याने खरेदी केलेल्या भूखंडाच्या दस्ताचा असल्याचे उघड झाले.

- Advertisement -

विशेष म्हणजे लोहणेर आणि मेशी येथील संबधित वादग्रस्त खरेदीखत नोंदणीसाठीचा मुद्रांक क्रमांक, मुद्रांक किंमत आणि मुद्रांक विक्रेता एकच असल्याचे आढळून आले आहे. यासंदर्भात निकम यांच्या वडिलोपार्जित मिळकतीशी संबधित खरेदी खताचा दस्त बनावट असल्याचे नमुद करत त्यााच्या आधारे झालेली फेरफार नोंद रदद करण्यासाठी महसूल खात्यासही सहदुययम निबंधक कार्यालयाने लेखी स्वरूपात कळविलेे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत चांदवड उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख हे करत आहेत.या चौकशीअंती सदर मिळकतीवरील नोंद रदद करण्यात येऊन मुळ मालकाचे नाव लावण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी देशमुख यांनी दिले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -