Monday, August 2, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र मानाच्या पालख्यांचे 19 जुलैला प्रस्थान,पालख्यांसाठी लाल परी धावणार

मानाच्या पालख्यांचे 19 जुलैला प्रस्थान,पालख्यांसाठी लाल परी धावणार

परिवहन मंत्री अ‍ॅड.अनिल परब यांची माहिती

Related Story

- Advertisement -

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे यंदाही आषाढी एकदशीनिमित्त राज्यातील 10 मानाच्या पालख्यांसाठी एसटीची ‘लाल परी’ 19 जुलैला धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. अनिल परब यांनी शनिवारी दिली. त्यासाठी संबंधित संस्थांना त्यांच्या मागणीप्रमाणे विनामूल्य एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मानाच्या पालख्या पंढरपूरला घेऊन जाण्याचा मान एसटीला मिळाल्याबद्दल परब यांनी समाधान व्यक्त केले आहे. यानिमित्ताने वारकरी सांप्रदायाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदाही वारीचा सोहळा साध्या पद्धतीने करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार कोरोनाचे संकट असतानाही आषाढी वारीची परंपरा जपण्यासाठी पायी वारी करण्याऐवजी राज्यातील 10 मानाच्या पालख्यांचा सोहळा बसमधून पंढरपूरपर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे, असे परब यांनी सांगितले.

- Advertisement -

एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी आपल्या जिल्ह्यातील संस्थांना, विश्वस्तांना प्रत्यक्ष भेटून मानाच्या पालख्यांसाठी एसटी महामंडळाच्या बसेस उपलब्ध करून देत असल्याबाबत आश्वस्त करावे, अशा सूचना दिल्याचे परब म्हणाले.

या पालख्यांचा प्रवास मूळ ठिकाणापासून पंढरपूर येथील वाखरीपर्यंत एसटीच्या बसमधून होणार आहे. त्यानंतर या पालख्या वाखरीपासून पुढे चालत पंढरपूरला जातील. वारकर्‍यांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीकोनातून सर्व बसेस निर्जंतुकीकरण करण्यात येतील. तसेच प्रवासादरम्यान वारकर्‍यांसाठी सॅनिटायझर आणि मास्कही महामंडळाच्यावतीने उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.

- Advertisement -