ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप, देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

ओबीसी आरक्षणावर आपण सातत्याने संघर्ष करीत आहोत. डिसेंबर 19 ते मार्च 22 या काळात केवळ वेळकाढू धोरण राज्य सरकारने राबविले. जी कार्यपद्धती मध्य प्रदेश सरकारला कळविली, तीच महाराष्ट्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितली. पण मध्य प्रदेश जे करू शकले, ते महाराष्ट्राने केले नसल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.

bjp devendra fadanvis reaction on shivsena kirit somaiya car attack mumbai police
Kirit Somaiya Car Attack : पोलीस संरक्षणात गुंडगिरी सुरु, जशास तसं उत्तर देणार; सोमय्यांवरील हल्ल्यानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

मुंबईः आम्ही जे वारंवार म्हणतो, की ओबीसी आरक्षण घालविणे हे महाविकास आघाडी सरकारचे पाप आहे. ओबीसी आरक्षण रद्द करणे हे राज्य सरकारमधील कुणाचे तरी षडयंत्र आहे. यांनी ओबीसी आरक्षणाची हत्या केली आहे, असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय.

भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती बैठकीत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे बोलत आहेत. ओबीसी आरक्षणावर आपण सातत्याने संघर्ष करीत आहोत. डिसेंबर 19 ते मार्च 22 या काळात केवळ वेळकाढू धोरण राज्य सरकारने राबविले. जी कार्यपद्धती मध्य प्रदेश सरकारला कळविली, तीच महाराष्ट्र सरकारला सुद्धा वारंवार सांगितली. पण मध्य प्रदेश जे करू शकले, ते महाराष्ट्राने केले नसल्याचा टोलाही देवेंद्र फडणवीसांनी लगावलाय.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारला 31 मे रोजी 8 वर्ष होत आहेत. हे सेवेचे पर्व आहे, सुशासनाचे पर्व आहे, हे गरीब कल्याणाचे पर्व आहे. माझे कुटुंब, माझी जबाबदारी नाही, तर प्रत्येक व्यक्तीला आपले मानत त्यांनी सुशासनाचा आदर्श उभा केला. आज जगातील अनेक देश महागाईने त्रस्त असताना त्यावर उपाययोजना करणारा भारत हा देश आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीला टोला लगावलाय.

पेट्रोल-डिझेलचे दर कमी करताना राज्याच्या वाट्याला धक्का लावला नाही, तर केंद्राच्या हिश्य्यातून 2.20 लाख कोटी रुपयांचा भार घेतला. आंतरराष्ट्रीय पातळीवर संकट असताना हा निर्णय नरेंद्र मोदीजी यांनी घेतला, तो केवळ सामान्य माणसाला दिलासा देण्यासाठी आहे. आता इंधनावर केंद्र सरकारचे कर आहेत 19 रुपये आणि राज्य सरकारचा कर आहे 30 रुपये आहे. आता सांगा इंधन दरवाढ कुणामुळे, असं म्हणत त्यांनी महाविकास आघाडी सरकारलाही धारेवर धरलेय.

आज राज्यात कांद्याचे प्रश्न आहेत, ऊसाचे प्रश्न आहेत, सोयाबीनचे प्रश्न आहेत. पण महाविकास आघाडी सरकार काहीच निर्णय घ्यायला तयार नाही. आपल्याला उत्सव नाही, तर संवाद करायचा आहे. नरेंद्र मोदीजी सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी लाभार्थी संवाद मेळावे करायचे आहेत, असंही फडणवीसांनी सांगितलंय.


हेही वाचाः Special Report: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेकडून दोन उमेदवारांची नावं आघाडीवर, अनेक नावांची चर्चा