केंद्राकडून अजूनही 15 हजार कोटी बाकी, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उत्तर

Deputy Chief Minister Ajit Pawar replied to the criticism made by Devendra Fadnavis on GST
केंद्राकडून अजूनही 15 हजार कोटी बाकी, देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री अजित पवारांचे उत्तर

महाविकास आघाडी सरकारकडून सातत्याने केंद्र सरकारने जीएसटीची देण्याची मागणी केली जात होती. यानंतर अखेर केंद्र सरकारकडून महाराष्ट्रासह इतर राज्यांना जीएसटी परतावा देण्यात आला आहे. यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. याला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी उत्तर दिले आहे.

महाराष्ट्राल मिळाला इतका परतावा –

केंद्र सरकारने एकूण 21 राज्यांना जीएसटी परतावा दिला आहे. यात महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, पश्चिम बंगाल राज्यांचा समावेश आहे. 21 राज्यांना मिळून 86 हजार 912 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे. महाराष्ट्राला 14 हजार 145 कोटी रुपयांचा परतावा देण्यात आला आहे.

हेही वाचा – केंद्र सरकारने राज्यांना दिला GST परतावा, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची टीका –

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट केले आहे. यात 31 मे 2022 पर्यंतचा जीएसटी, जानेवारीपर्यंतच्या कम्पेन्सेशनसह संपूर्ण रक्कम केंद्र सरकारने काल सर्व राज्यांना दिली. यात महाराष्ट्राला सर्वाधिक ₹14,145 कोटी आता तरी पेट्रोल-डिझेलचे दर महाराष्ट्रात कमी करणार की पुन्हा आज 1जूनपासूनचे शिल्लक दाखवून केंद्रावर खापर फोडत धन्यता मानणार?, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारत राज्य सरकारवर टीका केली.

15 हजार कोटी रुपये अद्याप बाकी –

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या ट्विट नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंद्र सरकारने दिलेले पैसे हे महाराष्ट्राच्या हक्काचे होते. ते आधीच द्यायला हवे होते. आता पैसे आले आहेत. जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये अद्याप बाकी आहे. केंद्र सरकाराने काल वितरित केलेले 14 कोटी रुपये हे जुने कबूल केलेले पैसे आहेत. पैसे टप्प्याटप्प्याने येत आहेत. आता पुढचे पण पैसे त्यांनी लवकर द्यावेत ही माफक अपेक्षा आहेत. 29 हजार कोटी येणं बाकी होतं. काल रात्री 14 हजार 145 कोटी रुपये एवढी रक्कम आलेली आहे अजून 15 हजार कोटी रुपये राहिलेले आहेत. ते पण पाठपुराव्याने मिळवू, अशी प्रतिक्रिया देत अद्यापही जीएसटीचे 15 हजार कोटी रुपये राहिल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा – GST परिषदेच्या शिफारशी केंद्र आणि राज्यांना बंधनकारक नाहीत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

जीएसटीचे पैसे पेट्रोल-डिझेल करता मिळालेले नव्हते –

जीएसटी परतावा मिळाला आता तरी महाराष्ट्रात इंधनावरील दर कमी करणार का, असा प्रश्न ट्विटमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विचारला होता. त्यावर जीएसटीचे पैसे काय पेट्रोल-डिझेल करता मिळालेले नव्हते. आम्ही पण पेट्रोल डिझेलचे दर कमी केले होते. केंद्राने पण कमी होते. मात्र, आपण दर कमी केल्यानंतर पुन्हा किंमती वाढतात, असे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले