घरमहाराष्ट्रएकजण म्हणतो मी परत येईन अन् दुसरे म्हणतात परत जाईन!

एकजण म्हणतो मी परत येईन अन् दुसरे म्हणतात परत जाईन!

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फडणवीस, पाटलांवर निशाणा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे त्यांचे सरकार नसल्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. एकजण म्हणत होते, मी पुन्हा येईन, ते दुर्दैवाने जमले नाही. आता दुसरे म्हणतात मी परत जाईन. परत जाईन म्हणणार्‍या चंद्रकांत पाटील यांना पुणेकरांनी बोलावले नव्हते. यामुळे आमची बहीण मेधा कुलकर्णी नाराज झाल्या.

कार्यकर्ते नाराज झाले. कारण तुम्ही एमएलसी होता. अर्थात तुमच्या पक्षातून कुठून उभे राहायचे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. परंतु एक वर्ष होईपर्यंतच जाईन म्हणायला लागले. लोकांनी पाच वर्षांसाठी तुम्हाला निवडून दिले आहे. कोथरुडची अपेक्षा की तिथली कामे व्हावीत. लगेचच परत जायची भाषा करायला लागले तर उद्या जर लोक काम घेऊन गेले तर ते म्हणतील मी परत जाणार आहे. मी परत जाणार. अरे मग आलात कशाला? तिथेच कोल्हापुरला थांबायचे होते, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला.

- Advertisement -

शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी भाजप नेत्यांवर टीका केली. हे आंदोलन करतात. मात्र, यांना दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी जमा झाले आहे, हे दिसत नाही. ते शेतकरी का जमा झाले आहेत. त्यांनी आपआपल्या घरी जाऊन आपली शेती करावी. त्यासाठी त्यांच्या काय मागण्या आहेत? यावर चर्चा करायला नको. यांनी शेतकर्‍यांच्या बाजूने निर्णय घेतले आहेत. तर शेतकरी रस्त्यावर का आला? शेतकरी एवढ्या कडक थंडीमध्ये आंदोलन का करत आहे. याचे आत्मपरीक्षण, आत्मचिंतन त्यांनी करावे. येथे काल बैलगाडीवर बसून फोटो काढले. त्याऐवजी दिल्लीत जाऊन त्या शेतकर्‍यांशी चर्चा करा, असा टोला पवार यांनी फडणवीस यांचे नाव न घेता हाणला.

उपमुख्यमंत्री पवार यांनी मेगाभरतीवर भाष्य केले. मी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत, असे कुठेही म्हटले नाही. मी त्यावेळेस सभागृहात म्हटले ते जगजाहीर आहे. काळजी घ्या, तुम्ही मागच्यावेळेस फोडाफोडी केली आहे. ते कशासाठी गेले तर आपले सरकार येणार नाही, भाजपचे सरकार येणार आहे, तिथे कामासाठी गेले. आता जे कामासाठी गेले त्यांची कामे तिकडे झाली नाहीत, तर ते कामासाठी दुसरीकडे जातील. एवढेच म्हटले. तीन-चार महिन्यात काही गोष्टी घडू शकतात. तो ही त्यांना राग आला. इतर पक्षातले आमदार घेताना त्यांना उकाळ्या फुटत होत्या. तेव्हा बरे वाटत होते. आता कसे वाटतेय. तर आता गार गार वाटायला लागले, असा शेरा पवार यांनी मारला.

- Advertisement -

मिशन पूर्ण करूनच परतणार-चंद्रकांत पाटील
मी पुणे सोडून जाणार असल्याच्या वक्तव्याने अनेकजण हुरळून गेले आहेत. मात्र, आपण आपले मिशन पूर्ण करूनच कोल्हापुरात परतू.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -