घरमहाराष्ट्रदिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत चौकशी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची SIT मार्फत चौकशी; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Subscribe

दिशा सालियन मृत्यू प्रकरणासाठी SIT मार्फत चौकशी होणार अशी घोषणा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. भाजप आणि शिंदे गटातील मंत्र्यांनी हे प्रकरण दोन्ही सभागृहात लावून धरत त्याची SIT स्थापन करत चौकशी करण्याची मागणी केली. दिशा सालियानच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण विधानसभेत भरत गोगावले आणि नितेश राणे यांनी उपस्थित केले. ज्यानंतर विधानसभेत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी दिशा सालियान मृत्यू प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी नितेश राणे यांनी केली. याप्रकरणावरून विधासभेचे कामकाज जवळपास पाच वेळी तहकूब करण्यात आले. फडणवीस यांच्या घोषणेमुळे आता ठाकरे गटातील माजी मंत्री आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणावरून विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. या दिशा सालियनच्या मृत्यूवेळी तिच्या घरी कोणता नेता होता? याची चौकशी करण्याची मागणी सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकारमधील नेत्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस विधानसभेत नेमकं काय म्हणाले? 

दिशा सालियन केस ही कधीच सीबीआयकडे गेली नाही. सुशांत सिंह राजपूत ही केस सीबीआयकडे गेली आहे. सीबीआयला ज्यावेळी या केससंदर्भात विचारलं तेव्हा सीबीआयने ही केस आपल्याकडे नाही असं सांगितलं, आम्ही या केसचा तपास करत नाही केलेला नाही. यासंदर्भात सीबीआयचा कोणताही क्लोजर रिपोर्ट नाही. सीबीआयकडे सुशांत सिंह राजपूत केस आहे. विरोधकांना आश्वासन देतो की, कुठलाही अभिनिवेश न ठेवता या संदर्भात जे काही पुरावे मांडले जात आहे. त्या पुराव्यांच्या आधारावर कुठलाही अभिनिवेश किंवा कोणाला टार्गेट करण्याचा विषय यात होणार नाही. अत्यंत निपक्षपणे चौकशी करु, नवीन पुरावे काही आले असतील तर त्यासंदर्भात चौकशी होईल, अशी भूमिका आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

पुजा चव्हाण प्रकरणाची देखील चौकशी करा

यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले की, दिशा सालियन जिवंत नसताना तिच्याबद्दल आणखी बोलून बदनाम करायचे नाही. तिच्या आई वडिलांनी हात जोडून विनंती केली की, आम्हाला आता जगू द्या, दिशाला बदनाम केले जात आहे. ती आम्हाला सोडून गेली आहे. दिशा सालियन प्रकरणाची चौकशी करायची असेल तर पुजा चव्हाण प्रकरणाची देखील चौकशी करा. चौकशी करायची असेल तर सर्वच चौकशी करता येईल. फक्त राजकारण करु नका, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.

याच मुद्द्यावरून आज भाजप नेते अमित साटम यांनी अनेक सवाल उपस्थित केले आहे. अमित साटम म्हणाले की,  दिशा सालियन मृत्यू प्रकरण हे केवळ एका युवतीचे मृत्यू प्रकरण नाही, हा मुंबई शहराच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. मुंबई शहरात अनेक युवक युवकी आशा आकांशा ठेवून करियर घडवतात, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलेत. या शहरात अनेक युवक युवती आपलं करियर घडवण्यासाठी बाहेरून येतात. या शहरातील युवक युवती आपलं करियर घडवत मेहनत करत असतात. त्यांच्या डोळ्यात स्वप्न असतात, अशा वेळी मेहनत करणाऱ्या सामान्य घरातून येणाऱ्या एका युवतीचा मृत्यू होणं आणि त्याची चौकशी न होणं यामध्ये जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई न होणं मुंबई शहराच्या प्रतिमेचा प्रश्न आहे. मुंबईतील महिला सुरक्षा आणि संरक्षणाचा प्रश्न आहे, त्यामुळे या प्रकरणात अनेक अनुत्तरित प्रश्न आहेत. ही घटना घडण्याच्या आधी ती युवती कुठे होती? तिचे व्हॉट्सअॅपवर कोणाशी संभाषण झाले, तिने कोणता फोटो कोणाला व्हॉट्सअपवर पाठवला होता. त्यानंतर मालाडच्या त्या ठिकाणी काय घडलं होतं? त्यामुळे या प्रकरणाची एसआयटीच्या माध्यमातून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अमित साटम यांनी केली आहे.

- Advertisement -

तिचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट समोर आला पाहिजे. तिच्यावर अत्याचार झाला होता का? या सर्व प्रश्नांची उत्तर समोर आली पाहिजे. या प्रकरणात जर कोणत्या मोठ्या व्यक्तीचा हात असेल तर त्या मोठ्या व्यक्तीला पाठीशी घालणं सहन करणार नाही, असा आरोपही अमित साटम यांनी केला.



sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -