उपमुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये सांगितला ड्रीम प्रोजेक्टचा प्लॅन, जाणून घ्या काय आहे प्रकल्प

Devendra Fadnavis
देवेंद्र फडणवीस

नागपूर: मुंबई- नागपूर समृद्धी महामार्गासारखाच नागपूर ते गोवा महामार्ग तयार करण्याच मानस असल्याचे उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी सांगीतले. त्यांनी नागपूर- गोवा हायवेसाठीचा अख्खा प्लॉन एका कार्यक्रमात सांगितला. नागपूर ते गोवा महामार्ग मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राला जोडून जाईल असे फडणवीस म्हणाले. यावेळी राज्यात कनेक्टिव्हीटी वाढवायची आहे आणि राज्यातील कोणत्याही भागात सहज पोहोचता येईल असे रस्ते आपल्याला तयार करायचे आहेत, असंही ते म्हणाले.

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला देवेंद्र फडणवीसांनी सुरुवात केली होती. समृद्धी महामार्ग देवेंद्र फडणवीसांचे ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो. याच्या पहिल्या टप्प्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे.  हा महामार्ग काही महिन्यात संपूर्ण महामार्ग तयार होईल असा अंदाज आहे. आता फडणवीसांनी आपले पुढचे टार्गेट नागपूरला गोव्याशी जोडण्याचे ठेवले आहे. यासाठी ते प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येत आहे.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग नेक्स्ट इकोनॅामीकल कॅारिडॅार –

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भाचा चेहरा बदलेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. समृद्धी महामार्ग नेक्स्ट इकोनॅामीकल कॅारिडॅार असून स्वातंत्र्यापासून ते २०१५ सालापर्यंत मुंबई एमएमआर रिजनमध्ये तीन लाख कोटी रुपये इन्फ्रास्टक्चरवर खर्च केले गेले. तेवढेच मी 5 वर्षांत केले, असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

नवीन सरकार काम करणारे –

नवीन सरकार फायलींवर बसणारे नाही. काम करणारे सरकार आहे, असे फडणवीस म्हणाले. दोन सव्वादोन वर्षच आमच्याकडे आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त वेगाने काम आम्हाला करायचे आहे. आम्हाला २०-२० मॅच खेळायची असल्याने राज्यात वेगाने विकास कामे होताना दिसतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.