व्हिपचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात याचिका दाखल करता येऊ शकते – देवेंद्र फडणवीस

maharashtra deputy cm devendra fadanvis speech in mangrove foundation awards

महाराष्ट्राच्या विधिमंडळातील दोन दिवसीय विशेष अधिवेशन संपन्न झालं आहे. हे अधिवेशन संपन्न झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी व्हीपच्या उल्लंघनाबाबत कशापद्धतीने कारवाई करता येऊ शकते, याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

व्हीपचं उल्लंघन केलं तर…

काल साधारणत: १२ वाजून १ मिनिटांनी विधानसभेचे अध्यक्ष निवडून आले. त्यानंतर १२ वाजून २ मिनिटांनी त्यांच्यावर अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आला. खरंतर ते टेक्निकली करता येत नाही. तथापि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला मान्यता मिळाल्यामुळे आणि त्यांनी काढलेला व्हीप लागू होणार हे माहिती असल्यामुळे त्या व्हीपचं उल्लंघन केलं तर त्याविरोधात याचिका दाखल करता येऊ शकते, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ही याचिका अध्यक्षांना ऐकता येऊ नये. कारण अविस्वास प्रस्ताव असेल तर जोपर्यंत निर्णय होत नाही. तोपर्यंत अध्यक्ष याचिका ऐकू शकत नाही, म्हणून हा केलेला कारभार होता. परंतु आज आम्ही विश्वासमताचा प्रस्ताव पास केल्यामुळे विश्वासाचा प्रस्ताव व्यब्गत होणार आहे. कारण एकाच विषयांवरचे दोन प्रस्ताव म्हणजे एक प्रस्ताव पास झाल्याशिवाय दुसरा आणता येत नाही. त्यामुळे आज ज्या लोकांनी व्हीपचं उल्लंघन केलंय. त्यांच्या विरोधातील कारवाई गटनेते म्हणून एकनाथ शिंदे आणि प्रतोद भरतशेठ गोगावले यांनी दाखल केली, तर त्यांच्यावर निश्चितपणाने कारवाई होऊ शकते. याकरिता हा विश्वास मताचा प्रस्ताव आज त्याठिकाणी पारित करण्यात आला आहे, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

१८ जुलैपासून आपलं नियोजित अधिवेशन

आज सभागृहाचं कामकाज संपलं असलं तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगल्या घोषणा देखील केल्या आहेत. १८ जुलैपासून आपलं नियोजित अधिवेशन आहे. परंतु १८ जुलै रोजी राष्ट्रपतींची निवडणूक आहे. त्यामुळे त्यादिवशी अधिवेशन कदाचित घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे त्याची नेमकी तारीख काय असेल?, याबाबत चर्चा करून लवकरच आम्ही निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.


हेही वाचा : विरोधी पक्षनेता म्हणून राणेंसारखा दरारा मी कधीही पाहिला नाही, अजित पवारांकडून कौतुक