Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 'पर्यावरण विघ्नहर्ता' स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘पर्यावरण विघ्नहर्ता’ स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन

Subscribe

मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते “पर्यावरण विघ्नहर्ता – २०२३” या पर्यावरणस्नेही राज्यस्तरीय श्रीगणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच मंत्रालयात झाले. ही स्पर्धा 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडले. या स्पर्धेचे तिसरे वर्ष असून ती सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन गटांमध्ये संपन्न होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला पर्यावरणस्नेही गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन नुकतेच केलेले आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या शुभहस्ते राज्यस्तरीय श्रीगणेश मूर्ती आणि सजावट स्पर्धेच्या पोस्टरचे प्रकाशन नुकतेच मंत्रालयात झाले.

या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होऊन पर्यावरण रक्षणाच्या कार्यात कलात्मक सहभाग नोंदवावा, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी गणेशभक्तांना केले. पंचमहाभूते फाउंडेशनने या स्पर्धेचे आयोजन केलेले आहे. ही स्पर्धा 19 ते 28 सप्टेंबर या कालावधीत पार पडेल. हे स्पर्धेचे तिसरे वर्ष असून ती सार्वजनिक आणि घरगुती अशा दोन गटांमध्ये संपन्न होईल. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक रुपात शेकडो वृक्ष देण्यात येतील. मात्र यावर्षी याच वृक्षांची लागवड करुन ‘मिनी फॉरेस्ट’ उभारण्याचा मानस आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; बैठकीत घेण्यात आला ‘हा’ निर्णय

“पंचमहाभूते फाउंडेशन” ही एनजीओ या संपूर्ण चराचरात समाविष्ट असलेल्या जमीन, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांच्या जतन आणि संवर्धनासाठी कटिबद्ध आहे. वृक्ष लागवड, मिनी फॉरेस्ट, नेल फ्री ट्री, पर्क्युलेशन पिट्स, रेन वॉटर हार्वेस्टिंग यासोबतच “नो बाथ डे”, “टू मिनिट शॉवर”, “पर्यावरण विघ्नहर्ता” व “से नो टू प्लॅस्टिक वॉटर बॉटल” यासारख्या अभिनव कल्पना सातत्याने राबवत आहे. “सोल्युशन्स फॉर पॉल्युशन” हे ब्रीदवाक्य घेऊन जगभरातील पर्यावरणप्रेमी व्यक्ती आणि संस्था यांना या कार्यात सामावून घेण्यासाठी पंचमहाभूते विशेष प्रयत्नशील आहे. देशातील प्रथम पर्यावरणस्नेही राज्य अशी ओळख महाराष्ट्र राज्याला लाभावी, हे पंचमहाभूते फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे. फाउंडेशनची घोडदौड पाहता त्यांचे हे उद्दिष्ट लवकरच साकारेल यात शंकाच नाही.

- Advertisement -

- Advertisment -