Friday, June 2, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी", देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

“संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी”, देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका

Subscribe

मुंबई | “संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली सोडावी”, अशी बोचरी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस हे आज बेळगाव दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यादरम्यान देवेंद्र फडणवीसांची बेळगावमध्ये एक जाहीर सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीस बेळगावमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर निशाणा शाधला आहे.

बेळगावमध्ये आल्यानंतर तुम्हाला काळे झेंडे दाखविण्याचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे, पत्रकारांच्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊतांनी जर काँग्रेसची दलाली सोडली तर मी बेळगावमध्ये येणार नाही. राऊत हे बेळगावमध्ये काँग्रेसची दलाली करण्यासाठी आले आहेत. आम्हाला सांगण्यापेक्षा संजय राऊतांनी त्यांचा मित्र पक्ष काँग्रेसला सांगायला पाहिजे की, बेळगावमध्ये उमेदवार उभे करू नका. तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना प्रचारासाठी बेळगावमध्ये आणू नका. पंरतु, ते असे बोलत नाहीत. कारण, काँग्रेसच्या सांगण्यावर आमची मते कमी करण्यासाठी आणि काँग्रेसची दलाली करण्याकरिता संजय राऊत हे बेळगावमध्ये आले आहेत.”

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्रातील राजकारण्यांविरोधात उभे राहा, राऊतांचे बेळगावकरांना आवाहन

भाजप मराठी भाषिकांच्या पाठिशी 

- Advertisement -

“मी मराठी भाषिकांच्या पाठिशी आहे, आणि भाजप देखील आहे. म्हणूनच भाजपने बेळगावमध्ये मराठा बोर्ड तयार केले आहे”, अशा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी मराठी भाषिकांच्या पाठिशी आहात का? पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले.

हेही वाचा – भाजपाचे बडे नेते सीमाभागात कधी फिरकलेच नाहीत; संजय राऊतांचा मोठा आरोप

 

- Advertisment -