Friday, June 11, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र 'माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छू काम'; पुणे पोलीस मुख्यालयातील बांधकामावर अजितदादा...

‘माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छू काम’; पुणे पोलीस मुख्यालयातील बांधकामावर अजितदादा भडकले

Related Story

- Advertisement -

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या सडेतोड स्वभावासाठी ओळखले जातात. त्याचाच प्रत्यय आज पुण्यातील पोलीस मुख्यालयात आला. पुण्यातील पोलीस मुख्यालयातील बांधकामावरुन अजित पवार चांगलेच भडकले. अधिकारी आणि कंत्राटदाराला त्यांनी धारेवर धरलं. बांधकाम पाहून माझ्या भाषेत बोलायचं तर हे छा-छू काम’ झालं आहे, असं अजित पवार म्हणाले.

अजित पवार यांनी पुण्यातील पोलीस मुख्यालयाच्या कामाची पाहणी केली. पोलीस मुख्यालयातील कामांचा आढावा घेताना अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली. चांगलं काम बघण्यासाठी मला बोलवा, असं म्हणत कामाच्या दर्जावर अजित पवार संतापले. “गुप्ता मला अशा कामाच्या पाहणीला बोलावलं तर मी लई बारीक बघतो. माझ्या भाषेत बोलायचं तर हे ‘छा-छू’ काम आहे. या ठेकेदाराने पोलिसांचच काम अस केलंय तर बाकीच्यांचे काय?” असा प्रश्न विचार अजित पवारांनी पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनाही सुनावलं.

- Advertisement -

कोरोना काळात चांगली कामगिरी केलेल्या पोलिसांचा केला गौरव

अजित पवार यांनी शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील नुतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन करुन केलेल्या कामाची पाहणी केली. शिवाय कोरोना काळात सेवेत केलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव तसेच या सेवा काळात ज्यांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना पोलीस दलात नेमणूकीचे पत्रही त्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अजित पवार यांच्या हस्ते कर्तव्यावर असताना कोरोना विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झालेल्या अंमलदाराच्या तीन पाल्यांना अनुकंपा तत्वावर नियुक्तपत्र देवून पोलीस दलात नेमणूक करण्यात आली. त्यामध्ये सामेश संतोष म्हेत्रे, अभिजीत आनंद गायकवाड, प्रसाद दिलीप वावरे यांचा समावेश आहे.

- Advertisement -

- Advertisement -