खातेवाटपाआधी मंत्र्यांना झालं ‘बंगलेवाटप’; अजितदादा पुन्हा ‘देवगिरी’वर!

राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता या ३६ मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. त्यानुसार उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देवगिरी बंगला देण्यात आला आहे.

ajit pawar gets devgiri bungalow
देवगिरी बंगला अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच!

राज्यातल्या महाविकासआघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार नुकताच पार पडला. मात्र, त्यानंतर तिन्ही पक्षांमध्ये नाराजनाट्य सुरू झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर खातेवाटप देखील प्रलंबित असतानाच आता या मंत्र्यांना बंगलेवाटप मात्र करण्यात आलं आहे. यामध्ये सर्वात चर्चेत असलेले मंत्री अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वात चर्चेत असलेला बंगला अर्थात ‘देवगिरी’ बंगला या दोघांचाही समावेश आहे. अजित पवार यांना त्यांच्या आवडीप्रमाणेच देवगिरी बंगला मिळाला आहे. या बंगल्यासाठी महाविकासआघाडीतील एकूण ४ मंत्री प्रयत्नशील होते, असं बोललं जात आहे. मात्र, अखेर तो बंगला अजित पवार यांच्या पारड्यात पडला असून राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना मेघदूत बंगला मिळाला आहे. याआधी देखील मंत्री असताना अजित पवार यांचं वास्तव्य देवगिरी या शासकीय बंगल्यातच होतं. त्यामुळे हा बंगला त्यांच्या कायमच आवडीचा समजला जातो.

पहिल्यांदाच आमदार झालेले आणि थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागलेले आदित्य ठाकरे यांना ए-६ हा बंगला देण्यात आला आहे. याशिवाय दिलीप वळसे पाटील यांना ‘शिवगिरी’, तर अनिल देशमुख यांना ज्ञानेश्वरी बंगला देण्यात आला आहे.

मंत्र्यांच्या निवासस्थानांची यादी

अजित पवार – देवगिरी
अशोक चव्हाण -मेघदूत
दिलीप वळसे पाटील – शिवगिरी
अनिल देशमुख – ज्ञानेश्वरी
राजेंद्र शिंगणे – सातपुडा
राजेश टोपे – जेतवन
नवाब मलिक – अ-५
हसन मुश्रीफ – ब-५
वर्षा गायकवाड – ब-४
जितेंद्र आव्हाड – ब-१
सुनील केदार – ब-७
विजय वडेट्टीवार – अ-३
अमित देशमुख – अ-४
उदय सामंत – ब-२
दादाजी भुसे – ब-३
संजय राठोड – क-१
गुलाबराव पाटील – क-८
अॅड. के. सी. पाडवी – क-३
संदीपान भुमरे – क-४
शामराव पाटील – क-६
अनिल परब – क-५
अस्लम शेख – क-२
यशोमती ठाकूर – ब-६
शंकरराव गडाख – सुरुची-१६
धनंजय मुंडे – अ-९
आदित्य ठाकरे – अ-६
अब्दुल सत्तार – सुरुची १५
सतेज पाटील – सुरुची ३
शंभुराज देसाई – यशोधन-१२
बच्चू कडू – रॉकीहिल टॉवर-१२०२
दत्तात्रय भरणे – अवंती-१
विश्वजीत कदम – निलांबरी-३०२
राजेंद्र पाटील-यड्रावकर – सुरुची-२
संजय बनसोडे – रॉकीहिल टॉवर-१२०३
प्राजक्त तनपुरे – निलांबरी-४०२
आदिती तटकरे – सुनिती-१०

यासोबतच या मंत्र्यांना मंत्रालयातील कार्यालयांचं देखील वाटप करण्यात आलं आहे.

Mantralay Offices List 1

Mantralay Offices List 2