घरताज्या घडामोडीफडणवीसांची राज्यातच नाही तर केंद्रात एन्ट्री, मोदींनी दिली मोठी जबाबदारी

फडणवीसांची राज्यातच नाही तर केंद्रात एन्ट्री, मोदींनी दिली मोठी जबाबदारी

Subscribe

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर जवळपास दीड महिना पूर्ण झाला आहे. आता विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. परंतु राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलेल्या देवेंद्र फडणवीस यांना पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आहे. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना आता केंद्रात स्थान मिळालं आहे. दरम्यान, भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने आज घोषणा केली असून राज्यातून फडणवीसांना स्थान देण्यात आलं आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आज पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली. यामध्ये देशभरातील भाजपाच्या १५ बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. समितीच्या अध्यक्षपदी जे.पी.नड्डा यांचा समावेश करण्यात आला आहे. तर सदस्यपदी पीएम नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, बीएस येदीयुरप्पा, सर्वानंद सोनोवाल, के.लक्ष्मण, इकबाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटीया, भुपेंद्र यादव, देवेंद्र फडणवीस, ओम माथुर, श्रीमती वनथी श्रीनिवास यांचा समावेश आहे. तर बीएल संतोष हे सचिवपदी असणार आहेत.

- Advertisement -

दरम्यान, भाजपच्या संसदीय समितीची घोषणा करण्यात आली असून भाजपाच्या १५ बड्या नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना वगळण्यात आलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : भाजप नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ईडी कारवाईची माहिती कशी मिळते?, अंबादास दानवेंचा सवाल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -