सर्वांच्या मनात सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना राबवणार, उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन

devendra fadnavis

नागपूर – “महाराष्ट्रात नवीन आलेले सरकार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये समाजातल्या सर्व स्तरातील लोकांना एकत्र घेऊन एक मजबूत, बलशाली आणि विकसित महाराष्ट्र तयार करेल. आपला स्वातंत्रदिन चिरायु होवो अशी प्रार्थना मी करतो. सर्वाच्या मनामध्ये सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार निश्चित राबवेल हा विश्वास व्यक्त करतो, असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ते नागपुरात बोलत होते.

हेही वाचा जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान; मोदींचा नवा नारा

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे आपला अमृतकाल सुरू झाला आहे. पुढच्या २५ वर्षांचा विचार करून आपल्याला बलशाली भारत करायचा आहे.सर्व समावेश विकास करायचा आहे. महाराष्ट्रात नवीन आलेलं सरकार एकनाथ श इंदे यांच्या नेतृत्त्वात मजबूत, बलशाली महाराष्ट्र तयार करेल. दिन दलित, गोर गरिब, शेतकरी, महिला, ओबीसी, अल्पसंख्यांक, बारा बलुतेदार सर्वांच्या मनात सकारात्मक परिवर्तन करणाऱ्या योजना हे सरकार राबवेल, याची खात्री आहे. सर्व नाम आणि अनाम स्वातंत्र्यसेनांनी मी आजच्या दिवशी नमन करतो.”

मोदींचा नवा नारा 

जय जवान, जय किसान, जय विज्ञान आणि जय अनुसंधान. लाल बहादूर शास्त्री जय जवान आणि जय किसानचे नारे आजही प्रासंगिक आहेत. ही देशाची गरज आहे. आपले तरुण हे करू शकतात. आम्ही संशोधनात पुढे जाऊ, असं म्हणत मोदींनी नवा नारा दिला आहे.

आत्मनिर्भर भारत सरकारचा अजेंडा नसून जनआंदोलन 

आपण आपले पोट स्वत: भरणार असा निर्धार करु तेव्हा देशाने ते करून दाखवले असे म्हणता येईल. त्यामुळे आत्मनिर्भर भारत ही प्रत्येक नागरिकाची, प्रत्येक सरकारची आणि समाजातील प्रत्येक घटकाची जबाबदारी बनते. आत्मनिर्भर भारत हा सरकारचा अजेंडा नसून ती समाजाची जनआंदोलन आहे. आपण हे पुढे नेले पाहिजे. जेव्हा आम्ही हे ऐकले तेव्हा स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरचा आवाज ऐकण्यासाठी आमचे कान आसुसले होते. 75 वर्षांनंतर मेड इन इंडिया तोफेने लाल किल्ल्यावरून तिरंग्याला सलामी देण्याचे काम केले आहे. कोण असेल तो हिंदुस्थानी ज्याला हा आवाज नवी प्रेरणा आणि बळ देणार नाही. मी माझ्या देशाच्या सैन्यातील सैनिकांचे अभिनंदन करू इच्छितो. आज माझ्या सैन्यातील जवानांनी आपल्या खांद्यावर घेतलेल्या जबाबदारीला मी सलाम करतो. लष्कराचा एक सैनिक मृत्यूला मुठीत घेऊन चालतो. सलाम, सलाम.. माझ्या सैन्यातील अधिकारी आणि जवानांना सलाम असही मोदी म्हणाले.