इमारत कोसळल्यास वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई; उपमुख्यमंत्री फडणवीसांचे आदेश

गुरुवारी सकाळपासूनत मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांत भूस्खलन होत आहेत. तसेच, काही धोकादायक इमारतीही कोसळत आहेत. त्यामुळे आता नोटीस दोऊनही इमारत कोसळली तरी संबंधित परिसरातील वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले.

devendra fadnavis said that the cabinet decision taken by mahavikas aghadi is invalid

गुरुवारी सकाळपासूनत मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागांत भूस्खलन होत आहेत. तसेच, काही धोकादायक इमारतीही कोसळत आहेत. त्यामुळे आता नोटीस दोऊनही इमारत कोसळली तरी संबंधित परिसरातील वॉर्ड अधिकाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आपत्ती व्यवस्थापन विभागासोबत बैठक झाली. (deputy cm devendra fadnavis took meeting of railway ndrf bmc officials)

या बैठकीला मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव तसेच हवामान विभाग, रेल्वे, बेस्ट, पालिका, लष्कराच्या तीनही दलाचे अधिकारी, जेएनपीटी आदींची उपस्थिती होती. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीत पावसाचा आढावा घेतला. दरम्यान या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांबाबत माहिती दिली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मेट्रोचे बरेच काम झाले आहे. मात्र कारशेडचे काम झाल्याशिवाय मेट्रो सुरू होऊ शकत नाही. मागच्या सरकारने जागा बदलल्याने हे काम रखडले आहे. आमच्या सरकारने सुरू केलेले आरेतले काम हे २५ टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रो लवकर सेवेत आणयची असेल तर मेट्रोचं कारशेड ही आरेमध्येच व्हावे, अशी आमची इच्छा आहे. मी उद्धव ठाकरे यांनाही इगो बाजुला ठेवण्याची विनंती केली, त्यांचा निर्णय हा चुकीचा होता”, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली.

“मुंबईतील धोकादायक इमारतींचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. पावसात इमारती कोसळण्याच्या घटना घडतात. महापालिकेकडून धोकादायक इमारतींना सूचना दिल्यानंतरही पुढची कारवाई केली जात नाही. त्यामुळे जिथे इमारत पडेल तिथे जर आधी नोटीस दिली नसेल तर संबधीत वार्ड अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना देण्यात आले आहेत”, असेही फडणवीस यांनी म्हटले. धोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरीकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना महापालिका अधिकाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.

मुंबईच्या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका हा सर्वप्रथम रेल्वे सेवेला बसतो. पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करुन ट्रेन बंद पडू नये यासाठी काय उपाययोजना केल्या आहेत या विषयी चर्चा झाल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. तसेच, मुसळधार पावसामुळे कोकणात दरडी कोसळण्याचा धोका असतो. या अनुषंगाने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याविषयी देखील अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आल्याचेही फडणवीस यांनी सांगीतले. दरडी कोसळणाऱ्या ठिकाणांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले.

“कोणती आपत्ती कधी येईल हे आपण सांगू शकत नाही. अथवा किती पाऊस पडेल हे आपल्या हातात नाही. यामुळे सतर्क राहणे गरजेचे आहे. एखाद्या आपत्कालीन स्थितीशी सामना करता येईल तसेच तत्काळ मदत देता येईल यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना आपत्कालीन विभागासहसर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत”, असेही फडणवीस यांनी म्हटले.


हेही वाचा – काय तो पाऊस…बीएमसी एकदम ओकेमध्ये