घरमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला; चर्चांना उधाण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्येला, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला; चर्चांना उधाण

Subscribe

मुंबईः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी अयोध्येला गेले. त्याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. तेथून ते अयोध्येला जाणार आहेत, असे कळते. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली वारीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अयोध्या दौरा नियोजित होता. मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत भाजपचे नेते आणि मंत्रीदेखील अयोध्येला गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे अयोध्येसाठी रवाना होत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले. कर्नाटका निवडणुकीच्या बैठकीसाठी फडणवीस हे दिल्लीला गेल्याचे समजते. फडणवीस यांच्या दिल्ली वारीने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावर विरोधकांनी टीका केली. त्याला मुख्यमंत्री शिंदे यांनीही उत्तर दिले. दौऱ्याची धास्ती इतरांनी घेतली की नाही, हे मी म्हणणार नाही. परंतु मी सर्वांना कामाला लावलंय, जे घरात बसलेत त्यांना कामाला लावलं आहे. जे घरात बसायचे ते आता रस्तावर फिरू लागले आहेत, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

अयोध्या आमच्यासाठी अत्यंत श्रद्धेचा आणि भक्तिचा विषय आहे. त्यामुळे अयोध्येला जाण्याचा जेव्हा योग येतो. त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळतो. त्यामुळे राम भक्तांची संपूर्ण टीम ही अयोध्येला रवाना झाली आहे, असं शिंदे म्हणाले. नाना पटोले म्हणतात आम्ही अयोध्येला जाणार, यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्यामुळे का होईना परंतु सर्वच जण रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी ललाईत झाले आहेत. रामलल्लाची पावन भूमी हा आमच्यासाठी फार श्रद्धेचा विषय आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्यदिव्य असं राम मंदिराचं निर्माण केलं जातंय. जे स्वप्न हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पाहिलं होतं. त्या स्वप्नाची लवकरच पूर्ती होणार आहे. मंदिरासाठी महाराष्ट्रातून सागाचं लाकूड पाठवण्यात येत आहे. ही सर्वांना आनंदाची बाब आहे, असं शिंदे म्हणाले. शुक्रवारी ह्जारो कार्यकर्ते ठाणे आणि नाशिक येथून अयोध्येला गेले तर शनिवारी मुख्यमंत्री शिंदे अयोध्येला गेले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -