घरताज्या घडामोडीदेवगड जामसंडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजप गटात सामील

देवगड जामसंडेच्या उपनगराध्यक्ष मिताली सावंत भाजप गटात सामील

Subscribe

देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली राजेश सावंत यानी भारतीय जनता पक्षाच्या नगर विकास समितीची वाट धरली आहे.

सिंधुदुर्ग (तेजस्वी काळसेकर) : देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली राजेश सावंत यानी भारतीय जनता पक्षाच्या नगर विकास समितीची वाट धरली आहे. शहर विकासासाठी व आपल्या प्रभाग विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे व भाजप प्रणित देवगड जामसंडे नगर विकास समितीत दाखल होत असल्याबाबत पत्र सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांना सादर केल्याची माहिती आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्गनगरी येथील पत्रकार परिषदेत दिली. (Deputy President of Devgad Jamsande Mithali Rajesh Sawant joins BJP group)

भ्रष्टाचाराच्या आरोपावरून ठाकरे शिवसेनेचा एक नगरसेवक अपात्र झाला आहे. या महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचारी कारभार कंटाळून शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकमेव नगरसेविका व विद्यमान उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांनी महाविकास आघाडीचा गट सोडून भारतीय जनता पक्षाच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शहरातील वॉर्ड क्रमांक 10 मधून कायम निवडून येतात या वार्डमधील ज्येष्ठ नागरीक व त्यांच्या प्रभागामधील मतदार व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून आपल्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे व त्या भारतीय जनता पक्षाच्या गटात सामील होत आहेत असेही आमदार नितेश राणे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

ठाकरे शिवसेना गटाचे व महाविकास आघाडीचे नेते आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात मात्र, त्यांचाच एक नगरसेवक भ्रष्टाचाराचा आरोपाखाली अपात्र होतो व अशाच कारणामुळे महाविकास आघाडीतील उपनगराध्यक्ष सावंत गट सोडून भाजप गटात सामील होतात यावरून महाविद्यास आघाडीचा भ्रष्टाचारी कारभार उघड होत आहे याकडेही आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले आहे.

या पत्रकार परिषदेवेळी गटनेते शरद ठाकरुल माजी नगराध्यक्ष प्रणाली माने, शहराध्यक्ष योगेश पाटकर, योगेश चांदोसकर, दयानंद पाटील, मिलिंद माने, आनंद देवगडकर आधी पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा तथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मिताली सावंत यांनी महाविकास आघाडीला सोडचिट्टी दिल्याचे लेखी पत्र जिल्हाधिकारी के मंजू लक्ष्मी यांच्यासमोर सोमवार सादर केले.

या नगरपंचायतीमध्ये ठाकरे शिवसेनेचे आठ त्यातून भ्रष्टाचाराचा आरोपाखाली एक सदस्य अपात्र झाल्यामुळे सात नगरसेवक शिल्लक राहिले आहेत तर या गटात सामील असलेल्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका तथा उपनगराध्यक्ष या गटातून बाहेर पडल्यामुळे महाविकास आघाडीचे संख्याबळ सातवर आले आहे व भाजपचे संख्या वाढले आहे. त्यामुळे पुढच्या काळात देवगड नगरपंचायतीवर भारतीय जनता पक्षाच्या नगर विकास समितीची सत्ता येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


हेही वाचा – अजित पवारांचा पुणे दौरा रद्द अन् भाजपाचे नेते दिल्लीत; राजकीय चर्चांना उधाण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -