घरताज्या घडामोडीमहिलांच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

महिलांच्या तक्रारीची तात्काळ दखल घ्या, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

Subscribe

गृह विभागातील सुधारणांची आवश्यकता आहे तिथे शासनाच्या नियमांनुसार योग्य ती कार्यवाही गृह विभागाने करावी

पोलीस प्रशासनाने महिला दक्षता समित्यांचे कामकाज प्रभावीपणे होण्यासाठी लक्ष द्यावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले. विधानभवनात महिलांविषयक तक्रारीसंदर्भात दूरदृश्यप्रणालीद्वारे बैठक पार पडली. यावेळी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई, पोलीस महासंचालक (महिला विरोधी अत्याचार प्रतिबंधक) राजवर्धन, संबधित जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, महिला दक्षता समित्यांनी प्रभावीपणे कामकाज करावे याकरिता त्यांना योग्य मार्गदर्शन होणे गरजेचे आहे, कोविडच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवस न झालेल्या बैठका ऑनलाईन स्वरूपात घ्यावात. बालविवाह, पोटगी, सोशल मीडियामधून वेबसाईटवरून होणारी महिलांची फसवणूक, ऊसतोड कामागार जेव्हा कामाकरिता स्थलांतरित होतात तेव्हा त्यांच्या अल्पवयीन मुलींकरिता आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व सामाजिक संघटनांच्या सहकार्यातून विशेष बाब म्हणून लक्ष द्यावे, त्यांच्या काही तक्रारी आल्यास त्याचे तात्काळ निराकरण करावे. मुलींना फुस लावून पळवून नेण्याच्या घटनांचा तात्काळ तपास होणे गरजेचे आहे. जात पंचायतींकडून होणाऱ्या काही घटनांमध्ये तक्रारी येत आहेत वरील सर्व बाबतीत महिलांच्या तक्रारींची तात्काळ दखल घेण्याच्या सूचना डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केल्या.

- Advertisement -

महिलांविषयक तक्रारींवर तात्काळ कारवाई

गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्बंधाचे निकष पाळून महिला दक्षता समित्यांच्या बैठका सर्व जिल्ह्यात आयोजित कराव्यात. उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी दिलेल्या सूचनांसाठी जिथे गृह विभागातील सुधारणांची आवश्यकता आहे तिथे शासनाच्या नियमांनुसार योग्य ती कार्यवाही गृह विभागाने करावी, तसेच सातारा जिल्ह्यात फक्त पत्राद्वारे आलेल्या तक्रारींवरही पोलिसांनी कार्यवाही केली आहे हा उपक्रम स्तुत्य आहे. महिलांविषयक आलेल्या तक्रारींवर कुठल्याही प्रकारची दिरंगाई न होता तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी यावेळी दिले.

यावेळी पोलीस ठाणेनिहाय महिलांच्या दक्षता समित्यांची पुनर्रचना करणे, ग्रामीण भागातील कोविड सेंटर मधील महिला रुग्णांची सुरक्षा, कोविडमुळे अनाथ झालेली बालके, महिला अत्यांचार घटनांची घेण्यात येणारी तात्काळ दखल, महिलांसाठी सुरक्षेच्या योजना, प्रत्येक जिल्ह्याने राबविलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पोलीस विभागाने दिली.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -