निलम गोऱ्हेना जीवे मारण्याची धमकी, ‘हे’ आहे कारण

Deputy Speaker Nilam Gorhe has been threatened with death
या प्रकरणी निलम गोऱ्हेना जीवे मारण्याची धमकी, हे आहे कारण

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नीलम गोऱ्हे यांनी नगर पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. नीलम गोऱ्हे यांच्या पीएला फोन करुन धमकी देण्यात आली असून त्यांना ईमेलवरूनही धमकी देण्यात आली आहे. यात कोल्हापूरमधील हेरवाड ग्रामपंचायच्या विधवा प्रथा निर्मूलन निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या व्यक्तिने महिला अध्यक्ष, स्त्री आधार केंद्र, मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालयाला विधवा प्रथा निर्मूलनचे कार्यक्रम न घेण्याबाबत 25 मे 2022 रोजी मेल पाठवला आहे.

पाठवला हेरवाडच्या निर्णयाचे समर्थन न करण्याबाबत मेल –

राज्यात 5 मे, 2022 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथे ग्राम पंचायतीने विधवा प्रथेबाबत एक क्रांतिकारी निर्णय घेतला. या निर्णयाचे राज्यात सर्वत्र स्वागत झाले. निलम गोऱ्हे यांनी हेरवाड येथे भेट देऊन गावाचे अभिनंदन केले. या गावाच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाने 17 मे, 2022 रोजी एक विशेष परिपत्रक काढून सर्व ग्रामपंचायतीनी याचे अनुकरण करावे, असे आवाहन केले आहे. यानंतर स्त्री आधार केंद्र, उपसभापती कार्यालय आणि विधवा सन्मान कायदा समिती अभियानाच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर, अहमदनगर, पुणए, रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक संस्थांनी परिवर्तन बैठ आयोजित केली होती. यानंतर माथेफिरू व्यक्तीने मुख्यमंत्री, उपसभापती कार्यालय , स्त्री आधार केंद्र आणि मान्यवरांना हेरवाडच्या निर्णयाचे समर्थन करणारे कार्यक्रम न घेण्याबाबत 25 मेरोजी मले पाठवला होता.

योग्य कारवाई करण्याचे आश्वासन –

या बाबत त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षकांनी दिले आहे. याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार दखल करून अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना वेळीच रोखण्याबाबत योग्य ती कारवाई करण्याबाबत विनंती करण्यात येणार आहे, अशी माहिती विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली आहे.