राष्ट्रवादीच्या झिरवळ यांच्याकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद

deputy speaker of the maharashtra legislative assembly ncp mla narhari jhirwal

विधानसभेच्या रिक्त असलेल्या उपाध्यक्षपदासाठी शनिवारी निवडणूक घेण्यात येणार आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी गुरुवारी उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक कार्यक्रमानुसार शुक्रवारी दुपारी १२ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. उमेदवारी माघारीची मुदत १४ मार्च रोजी संध्याकाळी चार वाजेपर्यंत राहील.

दरम्यान, महाराष्ट्र विकास आघाडीत झालेल्या समझोत्यानुसार विधानसभेचे उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहे. त्यानुसार उपाध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ यांना उमेदवारी दिली आहे. झिरवळ हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

दरम्यान, भाजपने उपाध्यक्षपदाची निवडणूक लढविण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. अर्ज भरण्याच्या मुदतीपर्यंत भाजप निर्णय घेण्याची शक्यता आहे. भाजपने उमेदवार न दिल्यास विधानसभा उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने उमेदवार देऊन नंतर माघार घेतली होती.


हेही वाचा – पीएनंतर आता आमदारांच्या ड्रायव्हरचाही पगार राज्य सरकार देणार