घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात संस्कृती विश्वविद्यालयासाठी मोदींकडे साकडे

नाशकात संस्कृती विश्वविद्यालयासाठी मोदींकडे साकडे

Subscribe

नाशिक : नाशिक जिल्ह्याला पौराणिक महत्व प्राप्त आहे. प्रभू श्रीरामाच्या वास्तव्याने पावन झालेल्या नाशिकमध्येच आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वराचेही मंदिर आहे. रामायनाशी नात सांगणार्‍या नाशिकच्या तपोवन तसेच रामकुंड गोदाकाठाला विशेष धार्मिक महत्व प्राप्त आहे. याचसोबत दर बारा वर्षानी हिंदू धर्मातील सर्वात पवित्र सोहळा मानला जाणारा कुंभमेळाही नाशिकमध्ये भरतो. यासर्व बाबींमुळे हिंदू धर्मात व संपूर्ण देशात नाशिकचे आध्यात्मिक महत्व मोठे मानले जाते. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये संस्कृती दर्शन विश्वविद्यालय व्हावे अशी मागणी महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत खासदार हेमंत गोडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून नाशिकमध्ये संस्कृती विश्वविद्यापीठ निर्माण करण्याची मागणी केली आहे.

ज्या पद्धतीने वाराणसी येथे बीएचयू अंतर्गत संस्कृत विश्वविद्यालय, प्रयागराज येथे संस्कृत विश्वविद्यालय, उज्जेन येथे संदीपनी विश्वविद्यालय, हरिद्वार येथे संपूर्णांनंद संस्कृत विश्वविद्यालय आणि पतंजली योग विद्यापीठ आहे. त्याच पद्धतीने नाशिक किंवा त्र्यंबकेश्वर येथे संस्कृती दर्शन विश्वविद्यालय व्हावे. या विश्वविद्यालयात भारताचे प्राचीन शस्त्र, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, स्थापत्यवेद, योग, मीमांसा, व्याकरण, साहित्य, उपनिषद, वैदिकगणित, गीता, न्यायशास्त्र, दर्शनशस्त्र, तर्कशास्त्र, ज्योतिषशस्त्र, पुराण, काव्य या सगळ्यासोबत त्यातील विविध शाखाचे ज्ञान दिले जाईल. त्याचसोबत पुरातन भारतीय धर्मशास्त्राचे आधुनिक वैज्ञानिक दृष्टीकोणातून शिक्षण दिले जाऊ शकते. अश्या प्रकारचे एकूण भारतीय पुरातन संस्कृतीचे दर्शन ज्ञान देणारे विश्वविद्यापीठ आपल्या कार्यकाळात झाले तर ती एकप्रकारची एतिहासिक घटना असेल. असे खा. गोडसे यांनी पंतप्रधान मोदी यांना पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे.

- Advertisement -

याबाबत, पंतप्रधान नक्कीच सकारात्मक विचार करून नाशिक भारतीय पुरातन संस्कृतीच्या अध्यापनाचे व ज्ञानाचे वैश्विक केंद्र बनण्यासाठी संस्कृती दर्शन विश्वविद्यापीठ नाशिकमध्ये नक्कीच स्थापित होईल असा विश्वास महंत अनिकेतशास्त्री देशपांडे यांनी व्यक्त केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -