अमृता फडणवीस लाचप्रकरणी डिजायरन अनिक्षाला अटक, वडील अनिल जयसिंघानी फरार

Amruta Fadnavis Bribe Case | मुंबई – महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अमृता फडणवीस यांनी पोलीस तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अनिक्षा या डिझायनरला (Fashion Designer Aniksha Jaysinghani) अटक केली आहे. तर, बुकी असलेले अनिल जयसिंघानी (Anil Jaysinghani) अद्यापही फरार आहेत.

फॅशन डिझायनर अनिक्षा जयसिंघानी यांनी अमृता फडणवीस यांच्याशी जवळीक वाढवली होती. डिजायनर कपडे देऊन, गिफ्ट्स देऊन, कधी पुस्तक प्रकाशन करून अनिक्षाने अमृता फडणवीसांसोबत मैत्री केली. मैत्रीचा फायदा घेत तिने अमृता फडणवीसांना एक कोटींची लाच देत वडिलांना गुन्ह्यांतून बाहेर काढण्याची मागणी केली. तसंच, बुकींवर रेड टाकून पैसे कमावण्याचीही कल्पना सुचवली होती. याप्रकरणी अनिक्षाचा त्रास वाढू लागल्याने अमृता फडणवीस यांनी पोलिसांत तक्रार दाखल. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरू असतानाच याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांतून लिक झाली. या वृत्ताचे पडसाद काल सभागृहातही उमटले. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत संपूर्ण घटनेची इंत्थभूत माहिती दिली.

अमृता फडणवीसांना १ कोटींची लाच दिल्याचा प्रयत्न झाल्याची माहिती महाराष्ट्रभर पसरताच उल्हासनगरहून पोलिसांनी अनिक्षा जयसिघांनी हिला अटक केली. यावेळी तिचा भाऊ रुग्णालयात दाखल होता. तर, वडील अनिल जयसिंघानी अद्यापही फरार आहे. अनिल जयसिंघानी हा कुप्रिसद्ध बुकी असून गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो फरार आहे. तसंच, त्याच्यावर १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी काल सभागृहात दिली. अनिल जयसिंघानीला काही बुकींजची माहिती आहे. त्या बुकींवर धाड टाकून आपण पैसे कमावू शकतो, असं आमिष अनिक्षा जयसिंघानीने अमृता फडणवीसांना दाखवलं होतं, परंतु, याप्रकरणात अनिक्षाचा त्रास वाढू लागल्यानंतर अमृताने तिला ब्लॉक केलं. त्यानंतर, अनिक्षाने काही व्हिडीओ आणि फोटो दाखवून धमकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा अमृताने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली.

अनिल सिंघानिया लवकरच पोलिसांच्या ताब्यात आला असता. परंतु, आता त्याला हिंट मिळाली आहे. त्यामुळे तो पुन्हा केव्हा सापडेल हे सांगता येणार नाही असं म्हणतानाच मला आधीपासूनच माहिती होतं की मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतोय. माझ्या कुटुंबालाही ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न होतोय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.