परीक्षेत दोन वेळा नापास होऊनही नागराज मंजुळेंनी मानली नव्हती हार; म्हणाले…

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८ जूनला जाहीर केला जाईल अशी घोषणा महाराष्ट्र माध्यमाने ७ जून रोजी केली होती

आज संपूर्ण राज्यभरात महाराष्ट्र बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर होणार असून गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षित असलेला बारावीच्या परीक्षेचा निकाल कधी लागेल याच्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष होतं. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८ जूनला जाहीर केला जाईल अशी घोषणा महाराष्ट्र माध्यमाने ७ जून रोजी केली होती.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात दहावी आणि बारावी हे दोन खूप महत्त्वाचे टप्पे असतात. त्यामुळेच या निकालावर अनेकांचे लक्ष लागलेले असते. अनेक विद्यार्थी यशस्वीने हा टप्पा पार करतात, मात्र काही विद्यार्थ्यांच्या हाती अपयश येते. अशावेळी विद्यार्थ्यांनी हताश न होता, पुन्हा प्रयत्न करायला हवा. एकदा अपयश आले याचा अर्थ ते नेहमीच येईल असं नाही. अनेकदा अपयशी व्यक्ती सुद्धा कुठल्या ना कुठल्या कला गुणांमध्ये उत्तीर्ण असतात.

त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्याला काय करायची इच्छा आहे, कशामध्ये आपल्या अधिक यश मिळू शकते. या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे. समाजात अशी अनेक दिग्गज आहेत, जे आपल्या दहावी आणि बारावीमध्ये नापास झाले होते मात्र आज त्यांचे कतृत्व संपूर्ण जगभर प्रचलित झाले आहे. त्यांपैकीच एक उदाहरण म्हणजे दिग्दर्शक नागराज मंजुळे, त्यांनी स्वतः त्यांच्या फेसबुक पोस्टवरून त्यांचा दहावीच्या निकालाचा फोटो शेअर केला होता.

त्यावेळी ते म्हणाले होते की, “मी दहावीमध्ये दोनवेळा नापास झालो होतो. मात्र नापास झालो म्हणूवन फार काही फरक पडला नाही. त्यामुळे दहावी, बारावी, एम. पी. एस. सी. , यु. पी. एस. सी अशी कुठलीही परीक्षा असो. ती अंतिम कधीच नसते. यशापयशात… असल्या-नसल्यात आनंदानं जगत राहण्यापेक्षा दुसरं कुठलंही मोठं यश नाही”.

 


हेही वाचा :http://इयत्ता १२ वीचा निकाल जाहीर, ९४.२२ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण