Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सोळा कोटीचं इंजेक्शन घेऊनही चिमुरड्या वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी

सोळा कोटीचं इंजेक्शन घेऊनही चिमुरड्या वेदिका शिंदेची मृत्यूशी झुंज अपयशी

भोसरीतील वेदिका शिंदे या चिमुरडीला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी हा दुर्मिळ आजार झाला होता.

Related Story

- Advertisement -

आपल्या मुलीला दुर्धर आजारातून बरं करण्यासाठी भोसरी येथील वेदिकाच्या पालकांनी जीव ओतून सोळा कोटीच्या इंजेक्शनसाठी काही महिन्यांपुर्वी मदतीचे आवाहन केले होते. लोकांच्या मदतीने वेदिकासाठी अखेर सोळा कोटी रुपयांच्या इंजेक्शनची सोय झाली. मात्र अचानक वेदिकाला त्रास होऊ लागल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि तिथेच वेदिकाने जगाचा निरोप घेतला. आपल्या मुलीसाठी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा शेवटी विफल ठरली.

भोसरीतील वेदिका शिंदे या चिमुरडीला स्पायनल मस्कुलर ऍट्रॉफी ( Spinal muscular atrophy ) हा दुर्मिळ आजार झाला होता. यासाठी तिला तब्बल 16 कोटी रुपयांची झोलगेन्स्मा ही लस देण्यात आली होती. इतकी मोठी रक्कम जमा करण्यासाठी वेदिकाचे पालक सौरव शिंदे यांनी लोकांना मदतीसाठी आवाहन केलं होते. यानंतर वेदिकाच्या मदतीसाठी परदेशातूनही लोकांनी सहभाग घेत सोळा कोटी रुपयांची देणगी शेवटी जमा झाली. हे इंजेक्शन भारतात मागवण्यासाठी भरमसाठ कस्टम ड्यूटी आकारण्यात येत होती मात्र शिरुरचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी कस्टम ड्युटी माफ करण्यासाठी लोकसभेत आवाज उठवला व इंजक्शेनची कस्टम ड्युटी माफ करण्यात आली. वेदिकाला पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात इंजेक्शन देऊन पुढील उपाचार करण्यात येत होते. तसेच वेदिका पूर्ण बरी होऊन तिला डिस्चार्ज देखील देण्यात आला होता. मात्र रविवारी तिला अचानक श्वास घेण्यास त्रास झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. आणि उपचारा दरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.


- Advertisement -

हे हि वाचा – संतापजनक, मदतीच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार,चार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

- Advertisement -